Monsoon : सर्वांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मान्सूनने (Monsoon) आज संपूर्ण महाराष्ट्र व्यापला आहे. भारतीय हवामान विभागानं (Indian Meteorological Department) याबाबतची घोषणा केली आहे. गुजरात, राजस्थान, हरियाणा, पंजाब आणि जम्मू काश्मिरचा काही भाग सोडता संपूर्ण देशात मान्सून सक्रिय झाल्याची माहिती भारतीय हवामान विभागानं दिली आहे.


हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार संपूर्ण महाराष्ट्र मान्सूनने व्यापला आहे. गुजरात, राजस्थान, हरियाणा, पंजाब आणि जम्मू काश्मिरात पुढील दोन दिवसात मान्सून सक्रिय होण्यासाठी अनुकूल वातावरण असल्याची माहिती देखील हवामान विभागानं दिली आहे. सध्या राज्याच्या काही भागात पाऊस कोसळत आहे. अद्याप काही ठिकाणी पपावसाची प्रतिक्षा कायम आहे. 


मुंबईसह दिल्लीतही मान्सून दाखल


मुंबई (Mumbai) आणि दिल्लीत (Delhi) मान्सून सक्रिय झाल्याची अधिकृत घोषणा भारतीय हवामान विभागाकडून (IMD) करण्यात आली आहे. मुंबईत 11 जून रोजी मान्सून दाखल होण्याची तारीख आहे. तर दिल्लीत 27 जून रोजी मान्सून दाखल होत असतो. मात्र, यावर्षी मुंबईत 14 दिवस उशिराने मान्सून दाखल झाला आहे तर दिल्लीत दोन दिवस आधीच मान्सूनचे आगमन झाले आहे. परवापासूनच मुंबईत पावसाला सुरुवात झाली आहे. मुंबईच्या विविध भागात चांगला पाऊस कोसळत आहे. त्यामुळं हवामान विभाग मुंबईत मान्सून दाखल झाल्याची घोषणा कधी करणार याकडं सर्वांचं लक्ष लागलं होतं. अखेर आज हवामान विभागानं मुंबईसह दिल्लीत मान्सून दाखल झाल्याची घोषणा केली आहे.


Maharashtra rain : राज्याच्या विविध भागात पावसाची हजेरी


राज्याच्या विविध भागात पावसानं (Rain) हजेरी लावली आहे. कुठं हलका ते मध्यम स्वरुपाचा तर कुठे जोरदार पाऊस कोसळत आहे. मुंबईत कालपासून पावसाचा जोर चांगलाच वाढला आहे. अनेक ठिकाणी पहिल्याच पावसाच मुंबईची तुंबई झाल्याचं पाहायला मिळालं. त्याचबरोबर राज्यातील वाशिम, सोलापूर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, पालघर, वसई विरार, कोल्हापूर या भागात पावसानं जोरदार हजेरी लावली. तर काही ठिकाणी नागरिकांच्या घरात पावसाचे पाणी शिरल्याचे पाहायला मिळाले.


महत्त्वाच्या बातम्या:


Monsoon News : आनंदी आनंद गडे! मुंबईसह दिल्लीत मान्सून सक्रिय, हवामान विभागाची घोषणा