Monsoon News weather Update : देशातील वातावरणात बदल (Climate Chnahe) झाला आहे. कालच (30 मे) मान्सूनचे केरळमध्ये (Keral) आगमन झाले आहे. दिलेल्या अंदाजापेक्षा एक दिवस आधीच मान्सून (Monsoon) केरळमध्ये दाखल झाला आहे. त्यामुळं सर्वांनाच दिलासा मिळाला आहे. दरम्यान, मान्सून केरळमध्ये दाखल झाला असला तरी महाराष्ट्रात (Maharashtra) कधी येणार? असा प्रश्न उपस्थित केला जातोय. याबाबतची माहिती हवामान अभ्यासक पंजाबराव डख (Panjabrao dakh) यांनी दिली आहे. 


रेमल चक्रीवादळ मान्सूनच्या प्रवासासाठी पोषक ठरणार


भारतीय हवामान खात्याने काल 30 मे ला मान्सूनचे केरळमध्ये आगमन झाले असल्याचे नुकतेच जाहीर केले आहे. विशेष म्हणजे फक्त केरळच नाही तर ईशान्य भारताच्या अनेक भागांमध्ये मान्सूनने आगेकूच केली आहे. आता मान्सून केरळमध्ये पोहोचला असल्याने महाराष्ट्रात कधी दाखल होणार हा देखील सवाल उपस्थित होत आहे. खरेतर रेमल चक्रीवादळामुळे केरळच्या दिशेने येणाऱ्या मान्सूनवर परिणाम होणार अशी चिंता व्यक्त केली जात होती. मात्र बंगालच्या उपसागरात तयार झालेले हे चक्रीवादळ मान्सूनच्या प्रवासासाठी पोषक ठरले आहे.


येत्या दहा दिवसांनी मान्सूनचे महाराष्ट्रात आगमन होण्याची शक्यता


चक्रीवादळाच्या प्रभावामुळे मानसून केरळमध्ये नेहमीच्या तारखेच्या 2 दिवस आधीच दाखल झाला आहे. दरवर्षी मान्सून केरळमध्ये एक जूनला दाखल होत असतो. यंदा मात्र तो 30 मे 2024 ला दाखल झाला आहे. आता मान्सून टप्प्याटप्प्यानं पश्चिम किनारपट्टीवरून पुढे सरकणार आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार येत्या आठवड्यात किंवा येत्या दहा दिवसांनी मान्सूनचे महाराष्ट्रात आगमन होण्याची शक्यता आहे. सर्वप्रथम मान्सून तळ कोकणात दाखल होणार आहे. त्यानंतर तो मुंबईकडे जाईल आणि मग 15 जून पर्यंत संपूर्ण महाराष्ट्र व्यापेल असा अंदाज आहे. आयएमडीने यंदाच्या जून महिन्यात पाऊस सरासरीपेक्षा काहीसा कमी राहणार असे म्हटले आहे. पण, तरीही संपूर्ण मोसमात मात्र तो सामान्यहून अधिक बरसणार आहे.


अनेक ठिकाणी पाण्याची टंचाई


दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, सध्या मान्सूनसाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. हळूहळू मान्सून पुढे सरकत आहे. 8 जूनच्या आसपास मान्सून महाराष्ट्रात येण्याची शक्यता वर्तवली जातेय. दरम्यान, यावर्षी चांगला पाऊस होण्याचा अंदाजही हवामान विभागानं वर्तवला आहे. त्यामुळं शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळाला आहे. सध्या देशासह राज्यात मोठ्या प्रमाणावर तापमानात वाढ झालीय. याचा मोठा फटका नारिकांसह प्राण्यांना देखील बसतोय. अनेक ठिकाणी पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळं नागरिकांना आता पावसाची आवश्यकता आहे. 


महत्वाच्या बातम्या:


Mumbai Mosoon: केरळमध्ये मान्सून दाखल, मुंबईत कधी कोसळणार पाऊस? काय सांगतो हवामान खात्याचा अंदाज?