Monsoon 2025 : महाराष्ट्रातील सर्वांसाठीच एक आनंदाची बातमी समोर आली आहे. काल केरळमध्ये दाखल झालेला मान्सून (Monsoon)  अखेर आज (25 मे) महाराष्ट्रात (Maharashtra) दाखल झाला आहे. भारतीय हवामान विभागाकडून (IMD) अधिकृत याची घोषणा करण्यात आली आहे. साधारणपणे महाराष्ट्रात 7 जून रोजी मान्सून दाखल होत असतो, मात्र, यावर्षी 12 दिवस आधीच मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी (Farmers)  ही आनंदाची बातमी आहे. दरम्यान, पुढील तीन दिवसात मान्सून मुंबईत (Mumbai Monsson)  दाखल होण्यास अनुकूल वातावरण असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. दरम्यान, याआधी मुंबई मान्सून मे महिन्यात कधी दाखल झाला आहे, यासंदर्भातील माहिती पाहुयात. 

Continues below advertisement

काल केरळमध्ये मान्सूनचे आगमन झाले होते. त्यानंतर पुढच्या दोन दिवसात मान्सून महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली होती. मात्र, अशातच आजच मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला आहे. दरम्यान, महाराष्ट्रात जरी मान्सून दाखल झाला असला तरी अद्याप मुंबईत मान्सून दाखल झालेला नाही. पुढील तीन दिवसात मान्सून मुंबईत दाखल होण्यास अनुकूल वातावरण असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. दरम्यान, याआधी मे महिन्यात कोणत्या वर्षी मुंबईत मान्सून दाखल झाला होता, याबाबतची माहिती पाहुयात.

कोणत्या साली मुंबईत मे महिन्यात मान्सून दाखल झाला होता?

हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार 1956 साली मुंबईत लवकर मान्सून दाखल झाला होता. 29 मे रोजी मान्सून मुंबईत दाखल झाला होता. त्यानंतर 1962 साली 29 मे रोजी मान्सून मुंबईत दाखल झाला होता. त्यानंतर 1971 साली देखील 29 मे रोजीच मान्सून मुंबईत दाखल झाला होता. त्याचबरोबर 1990 मध्ये 31 मे रोजी मान्सून मुंबईत दाखल झाला होता. तर 2006 मध्ये 31 मे रोजी मान्सून दाखल झाल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. त्यानंतर यावर्षी कधी मान्सून मुंबईत दाखल होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. 

Continues below advertisement

राज्याच्या विविध भागात मुसळधार पाऊस

दरम्यान दक्षिण कोकण आणि गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यावर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने गेल्या तीन ते चार दिवसांपासून या भागांत प्रचंड पाऊस सुरु आहे. येत्या 36 तासांत राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. अनेक भागात पावसामुळं नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. काही भागात पावसामुळं जनजीवन देखील विस्कळीत झालं आहे. दरम्यान, एका बाजूला पाऊस पडत असताना दुसऱ्या बाजूला काही भागात शेती पिकांना देखील फटका बसत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. 

महत्वाच्या बातम्या:

Monsoon Rain in Maharashtra : आला रे आला.....आनंदाची बातमी, मान्सून अखेर महाराष्ट्रात दाखल