मुंबई :  खार पोलीस ठाण्यातील पोलिसांनी उल्लेखनीय कामगिरी केली असून एका हरवलेल्या मुलीचा शोध घेऊन तिला आत्महत्या करण्यापासून वाचवले. संबंधित मुलीला पोलिसांनी पालकांच्या स्वाधीन केले आहे. 


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खार पोलीस ठाण्यात 27 जुलै रोजी एक मुगली हलवल्याची तिच्या नातेवाईकांकडून तक्रार देण्यात आली. त्यांनुसार पोलीस ठाण्यात हरलवल्याचे नोंद करण्यात आली. नातेवाईकांनी दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी मुलीचा शोध सुरू केला. त्यामुळे ती एका रूग्णालयात नर्स म्हणून काम करत असल्याची माहिती मिलाळी. ज्या रूग्णालयात काम करत होती, त्याच रूग्णालयाच्या वसतिगृहात संबंधित मुलगी राहत होती.    
 
रूग्णालय आणि वसतिगृहातून मिळालेल्या माहितीच्या आधारे खार पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष कणसे, पोलीस उपनिरीक्षक सातपुते, महिला पोलीस उपनिरीक्षक शितल मेंगाडे, पोलीस हवालदार शिंदे यांच्या पथकाने मुलीचा तत्काळ शोध घेण्यास सुरुवात केली. त्यावेळी संबंधित मुलगी अंधेरी येथील एका हॉटेलमध्ये असल्याची माहिती मिळाली. पोलिसांचे पथक तत्काळ हॉटेलमध्ये पोहोचली. त्यावेळी संबंधित मुलगी हॉटेलमधील एका रूममध्ये एकटीच असल्याचे आढळून आले. तिच्याकडे सुरी, चाकू आणि फाशी घेण्यासाठी ओढणी मिळून आली. त्यामुळे ही मुलगी आत्महत्या करण्याच्या तयारीत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले.  


पोलीस पथकाने तिच्याकडे अधिक तपास केला असता नोकरी करीत असताना होणाऱ्या चुकांमुळे ती डिप्रेशनमध्ये गेली होती. याच डिप्रेशनमधून ती आज आत्महत्या करणार असल्याचे सांगितले. पोलीस पथकाने तिला विश्वासात घेऊन आत्महत्या करण्यापासून परावृत्त केले आणि  मुलीच्या वडिलांसोबत संपर्क करून खार पोलीस ठाण्यास येण्यास सांगितले. त्यानुसार मुलीचे आई आणि वडील खाल पोलीस ठाण्यात आले. खार पोलिसांनी समजूत काढून संबंधित मुलीला तिच्या आई-वडिलांच्या ताब्यात दिले.