नाशिक : 'तू मुझे अच्छी लगती है', असं म्हणत धावत्या रिक्षेत चालकाने तरुणीची छेड काढल्याचा प्रकार नाशिकमध्ये घडला आहे. धक्कादायक म्हणजे आरडाओरड करुनही रिक्षा न थांबवल्याने तरुणीने धावत्या रिक्षातून रस्त्यावर उडी घेतली. यामध्ये तरुणीच्या चेहरा आणि उजव्या हाताला जखम झाली आहे.
नाशिकच्या इंदिरानगर परिसरातील महाराष्ट्र बँकेसमोर काल (19 जून) दुपारी तीनच्या सुमारास ही घटना घडली. तरुणीने रिक्षात बसली असता आरोपी रिक्षाचालकाने तिचा हात पकडून 'तू मुझे अच्छी लगती है', असं म्हणत छेड काढली. यानंतर तरुणीने रिक्षा थांबवण्यास सांगितलं. तरीही रिक्षा न थांबवल्याने तिने आरडाओरडा करण्यास सुरुवात केली.
रिक्षा थांबवत नसल्याने तरुणीने थेट रस्त्यावर उडी मारली. यात तिच्या डोक्याला आणि हाताला दुखापत झाली आहे. यानंतर तरुणी आईसह पोलिस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी अंबड गावात राहणाऱ्या रवी गोफणे या 22 वर्षीय रिक्षाचालकाला रात्री अटक केली.
खरंतर रिक्षाचालकांकडून होणाऱ्या मारहाण, लुटमार यांसारख्या घटनांमुळे नाशिककर आधीच त्रस्त आहेत. त्यातच आता विनयभंगासारखे प्रकारही होऊ लागल्याने त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
'तू मुझे अच्छी लगती है' म्हणत रिक्षाचालकाकडून छेडछाड, तरुणीची धावत्या रिक्षातून उडी
प्रांजल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक
Updated at:
20 Jun 2019 10:42 AM (IST)
नाशिकच्या इंदिरानगर परिसरातील महाराष्ट्र बँकेसमोर काल (19 जून) दुपारी तीनच्या सुमारास ही घटना घडली.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -