मागील वर्षी कुंभमेळाच्या ध्वजारोहणावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोरच व्यासपीठावर महंत ग्यानदास आणि साध्वी भवंता यांच्यात वादावादी झाली होती. महंत ग्यानदास यांनी असभ्य वर्तन केल्याचा आरोप करत त्यांच्याविरोधात विनयभंगांची तक्रार करणार असल्याचं साध्वी त्रिकाल भवंता यांनी सांगितलं होतं.
त्रिकाल भवंता यांनी या संदर्भात पोलिस स्टेशन गाठलं होतं. मात्र पोलिसांनी तक्रारी दाखल करुन न घेतल्याने साध्वी त्रिकाल भवंता यांनी कोर्टात धाव घेतली होती. याची दखल घेत आता वर्षभराने महंत ग्यानदास यांच्याविरोधात खटला चालणार आहे.
संबंधित बातम्या