रत्नागिरी : नाणिजमधे नरेंद्र महाराजांच्या सत्कार समारंभाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत उपस्थित राहणार आहेत. मात्र मुख्यमंत्री नरेंद्र महाराजांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याने झालेल्या वादानंतर अनेक भाजप नेत्यांनी दांडी मारल्याचं समोर आलं आहे.
सरकारकडून कोणत्याही मंत्र्याची उपस्थिती नाही या कार्यक्रमाला नसेल, अशी माहिती आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर, अवजड उद्योग मंत्री अनंत गीते यांच्यासह राज्यातले मंत्री दीपक सावंत, रामदास कदम या कार्यक्रमाला उपस्थित राहणार होते.
मुख्यमंत्र्यांनी या कार्यक्रमात बोलताना, ‘जेव्हा राजसत्ता भ्रष्ट मार्गावर जाते, तेव्हा धर्मसत्ता त्याला मार्गावर आणण्याचं काम करते’ असे वक्तव्य करुन एकच खळबळ उडवली आहे.
रत्नागिरीच्या नाणिजच्या नरेंद्र महाराजांच्या 50 व्या वाढदिवस समारंभात ते बोलत होते. यावेळी केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, हंसराज अहिर, हरीभाऊ बागडे, सदभाऊ खोत, नाना पटोले, दादा इदाते, विनायक राऊत यासारखे नेते व्यासपीठावर उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांच्या राजसत्ता आणि धर्मसत्तेच्या या वक्तव्यावरुन त्यांच्यावर चहूबाजूंनी टीकेची झोड उठत आहे.