Kalyan News : कल्याणमध्ये (Kalyan)  पुन्हा एकदा मराठी अमराठी वाद झाल्याचे पाहायला मिळाले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी इडली हॉटेल चालकाला चांगलाच चोप दिला आहे. इडली हॉटेल चालकाने मराठी माणसाबद्दल अपशब्द वापरले होते. याबाबतचे रेकॉर्डिंग व्हायरल होताच इडली हॉटेल चालकाला हॉटेलसमोरच चोप दिला आहे. त्यानंतर हॉटेल चालकाने माफी मागितली आहे. कल्याण पूर्व दुर्गा माता मंदिर परिसरात ही घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडियो व्हायरल झाला आहे. 

Continues below advertisement

अलिबाग गुजराती पाट्या, मनसे कार्यकर्त्यांचा संताप अनावर 

अलिबाग आहे की गुजरात? असा सवाल करत मनसे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. गुजराती पाट्या हटवा अन्यथा काळे फासू अस इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी गुजराती व्यावसायिकांना दिला आहे. अलिबाग मनसे मराठीसाठी आक्रमक झाली आहे.  या प्रकरणी 15 दिवसांचा अलटीमेट दिला आहे. 

गुजराती पाट्या काढून मराठी करण्यासाठी 15 दिवसांचा अलटीमेट

अलिबागमध्ये हिंदी नंतर आता  गुजराती पाट्यांकडे मनसेने मोर्चा वळवल्याचे पाहायला मिळाले. महाराष्ट्रात मराठी पाट्यांना दुय्यम स्थान देऊन काहीजण गुजराती पाट्या लावताना दिसत आहेत. त्यामुळं अलिबागची मनसे चांगलीच आक्रमक झाली आहे. महाराष्ट्रात मराठी पाट्याच लावाव्यात असा आग्रह मनसेच्या कार्यकर्त्यांनी धरला आहे. तात्काळ गुजराती पाट्या हटवा अन्यथा काळे फासू असा गर्भित इशारा अलिबाग मधील काही गुजराती व्यावसायिकांना मनसेच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे. या पाट्या काढून मराठी करण्यासाठी मनसे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी 15 दिवसांचा अल्टीमेटम दिला आहे. दरम्यान, यावरुन पुन्हा एकदा मराठी विरुद्ध अमराठी असा वाद सुरु झाल्याचे पाहायला मिळत आहे. 

Continues below advertisement

महत्वाच्या बातम्या:

Raj Thackeray : समोरचा अमराठी असला तर लगेच हात सोडू नका, पण उर्मटपणे बोलला तर... राज ठाकरेंचा मनसैनिकांना आदेश