Continues below advertisement

मुंबई : गणेश चतुर्थीच्या निमित्ताने उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंच्या निवासस्थानी भेट दिल्यानंतर त्याची राजकीय चर्चा सुरू झाली आहे. यावरुन मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांनी केलेल्या पोस्टने लक्ष वेधलं आहे. ओरिजनल शिवसेना पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंच्या निवासस्थानी भेट दिल्याचं राजू पाटील म्हणाले.

गेल्या काही दिवसांपासून मनसेचे राजू पाटील हे सातत्याने एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांच्यावर टीका करत आहेत. वेगवेगळ्या मुद्द्यांवरून त्यांनी शिंदेंवर टीकेची झोड उठवल्याचं दिसतंय. आता उद्धव ठाकरेंचा ओरिजनल शिवसेनेचे पक्षप्रमुख असा उल्लेख करत त्यांनी एकनाथ शिंदेंना टोला लगावला.

Continues below advertisement

काय म्हणाले राजू पाटील?

आज ओरिजनल शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धवजी ठाकरे यांनी राजसाहेबांच्या शिवतीर्थ या निवास्थानी येऊन गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं...

या आधी डोंबिवलीतील पलावा पुलाच्या बांधकामावरुन राजू पाटील यांनी शिंदेंच्या शिवसेनेवर टीकेची झोड उठवली होती. पलावा पुलाचे उद्घाटन केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यावर खड्डे पडल्याचा व्हिडीओ राजू पाटील यांनी शेअर केला होता.

उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या निवासस्थानी

गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंची भेट झाली आहे. राज ठाकरेंच्या घरातील गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी उद्धव ठाकरे कुटुंबासह दाखल झाले होते. गेल्या दीड महिन्यात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंची तिसऱ्यांदा भेट झाली.

याआधी मराठी विजय मेळाव्याच्या निमित्ताने राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची भेट झाली होती. त्यानंतर उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाला राज ठाकरेंनी मातोश्री निवासस्थानावर जाऊन शुभेच्छा दिल्या होत्या. त्यामुळे उद्धव ठाकरे हे राज ठाकरेंच्या निवासस्थानी येणार का याची चर्चा होती. आज अखेर या चर्चांना पूर्णविराम मिळाला.

उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी तब्बल दोन तास उपस्थित होते. तब्बल 22 वर्षांनी उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या निवासस्थानी दाखल झाले होते. याआधी राज ठाकरेंच्या वडिलांचं निधन झालं तेव्हा उद्धव ठाकरे त्यांच्या निवासस्थानी गेले होते.

राज-उद्धव यांच्यात 10 मिनिटे स्वतंत्र चर्चा

गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी उद्धव ठाकरे दुपारी 12.30 वाजता शिवतीर्थ निवासस्थानी दाखल झाले होते. शिवतीर्थ निवासस्थानी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंची स्वतंत्र चर्चा झाल्याची माहिती आहेत. दोन्ही ठाकरे बंधूंमध्ये 10 मिनिटे स्वतंत्र चर्चा झाल्याची माहिती आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंमध्ये झालेल्या चर्चेचा तपशील गुलदस्त्यात आहे.

ही बातमी वाचा: