Raj Thackeray Uttarsabha Live Updates : राज्यातील सर्व मशिदीवरचे 3 मे पर्यंत भोंगे उतरवा : राज ठाकरे

MNS Raj Thackeray Live : राज ठाकरे यांची ठाण्यात सभा होणार आहेत. आजच्या उत्तरसभेत राज ठाकरे काय बोलणार याची उत्सुकता सगळ्यांनाच लागली आहे.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 12 Apr 2022 09:05 PM
Palghar News Update : पालघरधील वाडा तालुक्यातील सोनाळे येथील मजुरांवर रानडुक्कराचा हल्ला; पाच जण जखमी

Palghar News Update : पालघरधील वाडा तालुक्यातील सोनाळे बुद्रुक येथील नंबरपाडा येथील रहिवासी असलेले मजूर रोजगार हमी योजनेच्या कामावर जात असताना त्यांच्यावर रानडुक्कराने हल्ला केला आहे. यात पाच मजूर जखमी झाले आहेत. त्यापैकी दोघे गंभीर जखमी असून त्यांच्यावर वाडा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


वाडा तालुक्यातील सोनाळे बुद्रुक येथील बाळू रायात (वय 42 ) हे सकाळी कामावर निघाले असताना त्यांच्यावर रानडुक्कराणे हल्ला केला. यात ते गंभीर जखमी झाले आहेत, तर दुपारी घरी जात असताना रोहिदास रायात, काशीनाथ रायात, वनिता रायात, अनंता पवार यांच्यावरही रानडुक्कराने हल्ला केला. यात अनंता पवार हे गंभीर जखमी झाले आहेत. 

Raj Thackeray on Sharad Pawar : राज ठाकरे नाही तर शरद पवारांनी भूमिका बदलली : राज ठाकरे

Raj Thackeray on Sharad Pawar : देशाला परदेशी पंतप्रधान चालणार नाही, ही बोलणारी बाळासाहेब ठाकरे ही पहिली व्यक्ती. त्यानंतर हा धागा पकडत शरद पवार पक्षातून बाहेर पडले. निवडणुकानंतर पुन्हा दोन महिन्याात भूमीका बदलली आणि कृषीमंत्री झाले. राज ठाकरेंनी नाही तर शरद पवारांनी त्यांची भूमिका बदलली

Raj Thackeray Uttarsabha Live Updates : राज्यातील सर्व मशिदीवरचे 3 मे पर्यंत भोंगे उतरवा : राज ठाकरे

Raj Thackeray Live : मशिदीवरच्या भोंग्याचा आवाज बेसूर असतो. त्याचा कानांना त्रास होतो त्यामुळे भोंगे उतरवले पाहिजे. आम्ही आमची भूमिका मागे घेणार नाही. त्यामुळे मशिदीवरचे भोंगे उतरवले नाही तर हनुमान चालीसा लावणारचं.  3 मे पर्यंत मशिदीवरचे भोंगे उतरवा. आम्हाला कुठलीही तेढ निर्माण करायची नाही : राज ठाकरे

Raj Thackeray Live : मशिदीवरचे भोंगे उतरवले नाही तर हनुमान चालीसा लावणारचं : राज ठाकरे

Raj Thackeray Live :  मशिदीवरच्या भोंग्याचा आवाज बेसूर असतो. त्याचा कानांना त्रास होतो त्यामुळे भोंगे उतरवले पाहिजे. आम्ही आमची भूमिका मागे घेणार नाही. त्यामुळे मशिदीवरचे भोंगे उतरवले नाही तर हनुमान चालीसा लावणारचं : राज ठाकरे

Raj Thackeray Uttar Sabha : जेलमध्ये जाऊन आल्यावरही भुजबळ मंत्री झाले : राज ठाकरे

Raj Thackeray Uttar Sabha :  भुजबळांना त्यांच्या संस्थेतल्या गैरव्यवहारामुळे आत जावं लागलं.  दोन अडीच वर्षे जेल मध्ये गेल्यानंतर शपथ घेणारा पहिला नेता. जेलमध्ये जाऊन आल्यावरही भुजबळ मंत्री झाले

Raj Thackeray on Uniform Civil Code : देशात समान नागरी कायदा आणा : राज ठाकरे

Raj Thackeray on Uniform Civil Code :  देशात समान नागरी कायदा आणा. देशातील लोकसंख्येवर नियंत्रण आणता येईल, असा कायदा असे नरेंद्र मोदींनी आवाहन केले आहे. या गोष्टी  देशात होणे आवश्यक आहे. लोकसंख्येवर नियंत्रण आणले पाहिजे

Raj Thackeray on ED : मला ट्रॅक बदलावा लागत नाही : राज ठाकरे

Raj Thackeray  Uttar Sabha live : ईडीची नोटिस आली म्हणून राज ठाकरेंनी ट्रॅक बदलला असे म्हणातात. मी कधीही ट्रॅक बदलेला नाही. मी ईडीच्या कार्यालयात गेलो : राज ठाकरे

Raj Thackeray on Sharad Pawar : पवारांच्या घरी एसटी कर्मचारी जाणार हे तपास यंत्रणेला कळालं नाही : राज ठाकरे

Raj Thackeray on Sharad Pawar : माझ्या ताफ्याला कोणीतरी अडवणार आहे. हे तपास यंत्रणांना कळाले पण  एसटी कर्मचारी शरद पवारांच्या घरी जाणार  हे त्यांना माहित नव्हतं : राज ठाकरे

Raj Thackeray Live : राज ठाकरे सभास्थळी दाखल

Raj Thackeray Live : राज ठाकरे सभास्थळी दाखल झाले आहेत. 

Raj Thackeray Uttar Sabha Thane LIVE Updates : राज ठाकरे सभास्थळाकडे रवाना

Raj Thackeray Uttar Sabha Thane LIVE Updates : राज ठाकरे सभास्थळाकडे रवाना झाले आहेत. 

Salim Shaikh : माझा नेता कोणत्याही धर्माच्या विरोधात नाही: सलीम शेख

महाराष्ट्रामध्ये वेगळं चित्र रंगवलं जातंय, काही मुस्लिम कार्यकर्त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे मागे घ्यावेत असं आवाहन मनसे नेते सलीम शेख यांनी केलं आहे. 

Salim Shaikh : मोहम्मद पैगंबर, छत्रपती शिवराय, बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा माझ्यामध्ये डीएनए आहे: सलीम शेख

राज ठाकरेंच्या 2 तारखेच्या सभेनंतर माझा डीएनए काय आहे असा सवाल विचारण्यात आला होता. जगाला शांतीचा संदेश देणाऱ्या मोहम्मद पैगंबर, स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवराय, संविधान निर्माते बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा माझ्यामध्ये डीएनए आहे असं मनसे नेते सलीम शेख म्हणाले. 

Sandeep Deshpande : वसंत सेना ते पवार सेना असा शिवसेनेचा प्रवास आहे  : संदीप देशपांडे

Sandeep Deshpande : वसंत सेना ते पवार सेना असा शिवसेनेचा प्रवास आहे  : संदीप देशपांडे

Vasant More : निवडणुकांवेळी मनसेची आठवण का होत नाही? वसंत मोरेंचे सवाल

Vasant More : कोरोना काळात सर्वसामान्यांसाठी मनसेची दार उघडी होती.  कामं असतात तेव्हाच मनसेची आठवण येते, मात्र निवडणुकांवेळी मनसेची आठवण का होत नाही? असा सवाल वसंत मोरेंनी उपस्थित केले. 

Raj Thackeray Uttar Sabha Vasant More Live : कोरोना काळात सरकारने जी कामं करायला हवी ती मनसेने केली : वसंत मोरे

Vasant More Live :  कोरोनाचा काळ आठवला तररी अंगावर काटा येतो.  या कोरोना काळात काम करण्यात सरकार अपयशी ठरले. त्या वेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली. 

Raj Thackeray LIVE : राज ठाकरेंच्या उत्तर सभेचे जम्मू-काश्मीरमध्ये होणार लाईव्ह प्रक्षेपण

राज ठाकरेंच्या उत्तर सभेचे जम्मू-काश्मीरमध्ये लाईव्ह प्रक्षेपण होणार आहे. काश्मीरी पंडितांना राज ठाकरे यांची भुरळ पडली आहे. 

Raj Thackeray Live : राज ठाकरे यांच्या स्वागतासाठी 200 बाईक्स

राज ठाकरे यांच्या स्वागतासाठी 200 बाईक्स असणार आहेत. तसेच मनसैनिक 60×40 फुटांचा हनुमानाचा झेंडा पालघरवरुन आणणार आहेत. तर नाशिकमधून शेकडो कार्यकर्ते सभेसाठी ठाण्यात येणार आहेत.

Raj Thackeray : राज ठाकरेंच्या स्वागतासाठी मनसेची भव्य रॅली

मनसे अध्यक्ष राज ठाकरे ठाण्याच्या दिशेनं रवाना झाले आहेत. थोड्याच वेळात राज ठाकरेंची ठाण्यात जाहीर सभा होणार आहे. 
राज ठाकरेंच्या सभेआधी ठाण्यात मनसेच्या भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. 

Raj Thackeray : राज ठाकरे यांच्या ठाण्यातील सभेसाठी डोंबिवलीतून मनसे कार्यकर्ते रवाना

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची  ठाणे येथे उत्तरसभा होणार आहे .आठवडा भरापूर्वी मुंबई येथील सभेत राज ठाकरे यांनी मशीद ,मदरसे , भोंगे बाबत आक्रमक भूमिका घेतल्यानंतर राजकीय वर्तुळातून तीव्र  प्रतिक्रिया उमटल्या होत्या .या टीकेला आजच्या सभेत राज ठाकरे काय उत्तर देतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. या सभेच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसून येत आहे. या सभेसाठी डोंबिवलीतून मोठ्या प्रमाणात मनसे कार्यकर्ते ठाण्याच्या दिशेने रवाना झाले. डोंबिवली मनसे कार्यलयातून वाजत गाजत मनसेचे कार्यकर्ते पदाधिकारी डोंबिवलीहून ठाण्याला लोकलने  रवाना झाले आहेत.

MNS Raj Thackeray live : राज ठाकरे ठाण्याच्या दिशेनं रवाना

Raj Thackeray Live :   राज ठाकरे ठाण्याच्या दिशेनं रवाना  रवाना झाले आहेत. संध्याकाळी राज ठाकरे यांची ठाण्यात सभा होणार आहेत. या सभेच्या पार्श्वभूमीवर मनसेकडून राज ठाकरे यांच्या स्वागतासाठी भव्य रॅली काढण्यात आली आहे. दरम्यान या सभेत राज ठाकरे काय उत्तर देणार याकडेही सर्वाचं लक्ष लागलेलं आहे.

पार्श्वभूमी

 MNS Raj Thackeray live Thane, Mumbai : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज ठाण्यात उत्तरसभा आहे. गुढीपाडवा मेळाव्यात शिवतीर्थावर केलेल्या भाषणाचे पडसाद अद्यापही कायम असताना उत्तरसभेत राज ठाकरे काय बोलणार याची उत्सुकता सगळ्यांनाच लागली आहे. ठाण्यातील गडकरी रंगायतनसमोरील डॉ. मूस रोड इथे राज ठाकरे यांची ही सभा होणार आहे. रात्री साडेसातच्या सुमारास राज ठाकरे बोलायला सुरुवात करतील.


खरंतर राज ठाकरे यांची ठाण्यातील उत्तरसभा ही 9 एप्रिल रोजी होणार होती. परंतु तलावपाळी या ठिकाणी सभा घेण्याचा प्रस्ताव मनसेने पोलिसांना दिला होता. पण या ठिकाणी 9 तारखेला होणाऱ्या सभेला पोलिसांनी परवानगी नाकारली. त्यामुळे ही सभा आता 12 तारखेला म्हणजेच आज होणार आहे. दरम्यान या उत्तरसभेत राज ठाकरे यांच्या स्वागतासाठी 200 बाईक्स असतील. तसंच मनसैनिक 60×40 फुटांचा हनुमानाचा झेंडा पालघरवरुन आणणार आहेत. तर नाशिकमधून शेकडो कार्यकर्ते सभेसाठी ठाण्यात येणार आहेत.


अमेय खोपकर, संदीप देशपांडे यांचं ट्वीट


मनसे चित्रपट सेनेचे नेते अमेय खोपकर यांनी देखील राज ठाकरेंच्या उत्तरसभेबाबत ट्वीट केलं आहे. त्यांनी लिहिलं आहे की, "उत्तरसभा म्हणजे हिशेबाचा दिवस, आज राजसाहेब करारा जवाब देणार, आज ठाण्यात राजगर्जना घुमणार आणि भ्रष्टवादी महाखिचडीची तंतरणार, चलो ठाणे." 


तर मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी देखील ट्वीट करुन उत्तरसभेसंदर्भातील एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. यात राज ठाकरे यांची वाक्ये ऐकू येतात. ती अशी की, "वारं खूप सुटलंय आणि जे सुटलंय ते आपलंच आहे." 


उत्तर सभेत राज ठाकरे काय बोलणार?
या उत्तर सभेतील भाषणात राज ठाकरे मशिदीवरील भोंगे, हनुमान चालीसा, शरद पवार, एसटी आंदोलन अशा अनेक मुद्द्यांवर बोलण्याची शक्यता आहे. गुढीपाडवा मेळाव्यातील भाषणात मशिदींवरील भोंग, मदरशांमधील गैरप्रकार याबाबत केलेल्या वक्तव्यावरुन राजकारण चांगलंच तापलेलं आहे. शिवाय त्या भाषणात महाविकास आघाडी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर चौफेर हल्ला चढवला होता. गुढीपाडव्याच्या भाषणात राज ठाकरेंनी हिंदुत्वाच्या मुद्द्याची कास धरल्याचं स्पष्ट झालं आहे.आता या उत्तरसभेत राज ठाकरे कोणता मुद्दा मांडणार हे पाहावं लागेल.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.