MNS on Jogeshwari Fire : मुंबईतील जोगेश्वरीमधील JMS बिझनेस सेंटरच्या इमारतीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. तब्बल 4 तासानंतर आटोक्यात आली आहे. यामध्ये तब्बल चार मजले जळून खाक झाले आहेत. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. दरम्यान, या घटनेवरुन महाराष्ट्र नवनिर्माण सेना चांगलीच आक्रमक झाली आहे.  JMS बिजनेस पार्क इमारतीला OC नसताना विकासकांनी काही दुकाने विकली तर काही भाड्याने दिली होती. यामध्ये पालिका अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे ही घटना घडल्याचं आरोप मनसेनं केला आहे.

Continues below advertisement

संबंधित विकासक आणि पालिका अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवादाचा गुन्हा नोंद करण्याची मागणी 

संबंधित विकासक आणि पालिका अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवादाचा गुन्हा नोंद करण्याची मागणी महाराष्ट्र नव निर्माण सेनेने केली आहे. मनसे वर्सोवा विभाग अध्यक्ष संदेश देसाई यांनी ओशिवरा पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण यांना निवेदन देऊन कारवाई करण्याची मागणी केली आहे. जर पोलिसांनी संबंधित बीएमसी अधिकाऱ्यांवर आणि विकासकावर सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल नाही केला तर मनसे रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा वर्सोवा विधानसभा मतदारसंघाचे विभाग अध्यक्ष संदेश देसाई यांनी दिला आहे.

संबंधित अधिकाऱ्यांकडून तपास सुरू

शहरात आगीच्या घटना सतत घडत आहेत. ताज्या घटनेत जोगेश्वरी (Jogeshwari Fire) परिसरातील JMS बिझनेस सेंटरच्या इमारतीला भीषण आग लागली. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. ही आग इमारतीच्या चार मजल्यांपर्यंत पसरली होती. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नांनंतर (Jogeshwari Fire) अखेर आग नियंत्रणात आणण्यात यश आले. संबंधित अधिकाऱ्यांकडून तपास सुरू आहे. या आगीमध्ये अनेक जण अडकले होते, त्यांना बाहेर काढण्यात आलं आहे. जोगेश्वरी मध्ये जेएमएस बिजनेस पार्क इमारतीमध्ये लागली आग तब्बल 4 तासानंतर आटोक्यात आली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या मोठी चुकीमुळे ही आग लागल्याची माहिती समोर आली आहे.(Jogeshwari Fire) 

Continues below advertisement

16 ते 17 लोकांना या आगीमधून सुखरूप रेस्क्यू करण्यात आले

इमारतीमध्ये ओसी नसताना पालिकेकडून याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. इमारतीमध्ये ओसी (OC) नसताना मोठा संख्येमध्ये लोकं भाड्याने गोदाम आणि दुकान घेऊन ते चाललत होते. पालिकेने दुर्लक्ष केल्यामुळे आगीची घटना घडल्याचा स्थानिकांचा आरोप आहे. सध्या 16 ते 17 लोकांना या आगीमधून सुखरूप रेस्क्यू करण्यात आले आहे, तर पाच ते सहा जण जखमी झाले आहेत. ओशिवरा पोलीस आग कशामुळे लागली, ओसी (OC) नसताना विकासकाने इमारतीमधील दुकान भाड्याने कशी दिली, त्याचसोबत यामध्ये पालिकेने का दुर्लक्ष केलं या संदर्भात अधिक तपास करत आहे.