Election Result live updates: विधान परिषदेचा आखाडा, जाणून घ्या मतमोजणीचे प्रत्येक अपडेट्स एका क्लिकवर

MLC Election Result Live Updates : Vidhan Parishad Election Maharashtra : नागपूर आणि अकोला-बुलडाणा-वाशिम मतदारसंघाच्या विधानपरिषदेच्या निवडणुकांचा आज निकाल जाहीर होणार आहे.

abp majha web team Last Updated: 14 Dec 2021 08:41 AM
नागपुरात भाजपचा डंका; चंद्रशेखर बावनकुळे विजयी

नागपुरात भाजपचाच डंका, चंद्रशेखर बावनकुळे विजयी 

  • चंद्रशेखर बावळकुळे : 362

  • मंगेश देशमुख : 186

विधान परिषद निवडणुकीत भाजपच्या चंद्रशेखर बावनकुळे यांचा विजय निश्चित

विधान परिषद निवडणुकीत भाजपच्या चंद्रशेखर बावनकुळे यांचा विजय निश्चित. बावनकुळे यांना 362, तर मंगेश देशमुख यांना 186 मतं मिळाल्याची माहिती. नागपूरमध्ये बावनकुळे यांचा विजय निश्चित, अधिकृत घोषणेची प्रतीक्षा

विधानपरिषदेच्या निवडणुकीचे पहिले कल हाती; नागपुरातून भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे पहिल्या फेरीअखेर आघाडीवर

विधानपरिषदेच्या निवडणुकीचे पहिले  कल हाती; नागपुरातून भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे  पहिल्या फेरीअखेर आघाडीवर

नागपुरात कोण गड राखणार?

राज्याचे लक्ष नागपूरच्या निकालावर लागले आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह भाजप-काँग्रेस नेत्यांची प्रतिष्ठा या निवडणुकीत लागली आहे. भाजपने चंद्रशेखर बावनकुळे यांची उमेदवारी घोषित केल्यानंतर मोठ्या घडामोडी घडल्या. बावनकुळे यांच्या उमेदवारीच्या घोषणेनंतर भाजपात धुसफूस सुरू झाली होती. भाजपचे नगरसेवक छोटू भोयर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि उमेदवारी मिळवली. मात्र,  मतदानाच्या १२ तासांआधी नागपुरात काँग्रेसने छोटू भोयर यांचा पाठिंबा काढून घेतला आणि अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना पाठिंबा दिला. फाटाफूट होऊ नये यासाठी भाजपने आपल्या नगरसेवकांना नागपूरमधून बाहेर नेले होते. भाजपने या निवडणुकीत विजयाचा दावा केला आहे. तर, दुसरीकडे काँग्रेस नेत्यांनी चमत्कार होणार असल्याची भविष्यवाणी केली आहे. मतांच्या आकडेवारीनुसार भाजप विजयी होण्याची शक्यता आहे. 

मतदानाआधी नागपुरात झालेल्या राजकीय नाट्यामुळे निकालाकडे साऱ्यांचं लक्ष

काही वेळेत या दोन्ही मतदारसंघातील मतमोजणीला सुरुवात होणार आहे. विधान परिषदेच्या नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे विरुद्ध काँग्रेसचा पाठिंबा मिळालेले अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांच्यात सामना आहे. तर अकोला-वाशिम-बुलढाणा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात शिवसेनेचे गोपीकिशन बाजोरिया यांच्यासमोर भाजपाचे वसंत खंडेलवाल यांचं आव्हान आहे. बाजोरिया यांचे या मतदारसंघावर वर्चस्व आहे. तर, त्यांचे वर्चस्व मोडण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. तर, महाविकास आघाडीने बाजोरिया यांच्या विजयाचा दावा केला आहे.  हा मतदारसंघ 1998 पासून गेली चार टर्म शिवसेनेच्या ताब्यात आहे. विशेष म्हणजे या चारही निवडणुकीत शिवसेनेकडे मतदारांचं बहूमत नसतांनाही त्यांनी विजयाचा 'चमत्कार' घडवून आणला आहे. यातील तीन टर्म शिवसेनेचे गोपीकिशन बाजोरिया हे या मतदारसंघातून विजयी झाले आहेत. आता यावेळी गोपीकिशन बाजोरिया हे सलग चौथ्यांदा विजयासाठी प्रयत्नशील आहेत.

Vidhan Parishad Election Maharashtra : विधान परिषदेच्या दोन जागांचा आज निकाल

Vidhan Parishad Election Maharashtra : नागपूर आणि अकोला-बुलडाणा-वाशिम मतदारसंघाच्या विधानपरिषदेच्या जागांसाठी आज मतमोजणी होणार आहे. महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशी थेट लढत या दोन्ही जागांवर होणार आहे. या निवडणुकीत काही चमत्कार होणार की अपेक्षित निकाल लागणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. विशेषत: नागपूरच्या निकालाकडे राज्याचे लक्ष लागले आहे. 

पार्श्वभूमी

Vidhan Parishad Election Maharashtra Live updates : नागपूर आणि अकोला-बुलडाणा-वाशिम मतदारसंघाच्या विधानपरिषदेच्या जागांसाठी आज मतमोजणी होणार आहे. महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशी थेट लढत या दोन्ही जागांवर होणार आहे. या निवडणुकीत काही चमत्कार होणार की अपेक्षित निकाल लागणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. विशेषत: नागपूरच्या निकालाकडे राज्याचे लक्ष लागले आहे. 

विधान परिषदेच्या नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे विरुद्ध काँग्रेसचा पाठिंबा मिळालेले अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांच्यात सामना आहे. तर अकोला-वाशिम-बुलढाणा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात शिवसेनेचे गोपीकिशन बाजोरिया यांच्यासमोर भाजपाचे वसंत खंडेलवाल यांचं आव्हान आहे. बाजोरिया यांचे या मतदारसंघावर वर्चस्व आहे. तर, त्यांचे वर्चस्व मोडण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. तर, महाविकास आघाडीने बाजोरिया यांच्या विजयाचा दावा केला आहे. 

गोपीकिशन बाजोरिया राजकारणासोबतच प्रॉपर्टी आणि बांधकाम क्षेत्रातलं मोठं नाव आहे. याआधीच्या बाजोरियांच्या तिन्ही निवडणूकांत त्यांच्यासोबत युती असल्याने भाजपचं पाठबळ होतं. मात्र, बदललेल्या राजकीय परिस्थितीमुळे बाजोरियांसमोर आता भाजपचं आव्हान असणार आहे. तर आधीचे विरोधक असलेले काँग्रेस-राष्ट्रवादी या निवडणुकीत त्यांच्यासोबत असण्याची शक्यता आहे. मात्र, बाजोरियांचा तिन्ही जिल्ह्यांतील सर्वपक्षीय मतदारांसोबत दांडगा जनसंपर्क आहे. याच बळावर त्यांनी गेल्या तिन्ही निवडणूंकांत विजयाचे 'अर्थ' बदलवत बाजी मारली आहे

राज्याचे लक्ष नागपूरच्या निकालावर लागले आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह भाजप-काँग्रेस नेत्यांची प्रतिष्ठा या निवडणुकीत लागली आहे. भाजपने चंद्रशेखर बावनकुळे यांची उमेदवारी घोषित केल्यानंतर मोठ्या घडामोडी घडल्या. बावनकुळे यांच्या उमेदवारीच्या घोषणेनंतर भाजपात धुसफूस सुरू झाली होती. भाजपचे नगरसेवक छोटू भोयर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि उमेदवारी मिळवली. मात्र,  मतदानाच्या १२ तासांआधी नागपुरात काँग्रेसने छोटू भोयर यांचा पाठिंबा काढून घेतला आणि अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना पाठिंबा दिला. फाटाफूट होऊ नये यासाठी भाजपने आपल्या नगरसेवकांना नागपूरमधून बाहेर नेले होते. भाजपने या निवडणुकीत विजयाचा दावा केला आहे. तर, दुसरीकडे काँग्रेस नेत्यांनी चमत्कार होणार असल्याची भविष्यवाणी केली आहे. मतांच्या आकडेवारीनुसार भाजप विजयी होण्याची शक्यता आहे. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.