सातारा : सध्या साताऱ्यातील खा. उदयनराजे भोसले आणि आ. शिवेंद्रराजे भोसले यांच्यातील संघर्षाने टोक गाठलं आहे. शिवेंद्रराजेंना पोलिसांकडून लक्ष्य केलं जात असल्याचा आरोप होत असल्याने, शिवेंद्रराजेंनी थेट उदयनराजेंनाच आव्हान दिलं आहे. ‘आपल्यावर असे हल्ले होणार असतील, तर आपण हातात बांगड्या भरलेल्या नाहीत,’ असा इशारा आ. शिवेंद्रराजे यांनी पत्रकार परिषदेत दिला.


आनेवाडी टोलनाक्यावरील वर्चस्व वादाने टोक गाठले आहे. या वर्चस्व वादातून शुक्रवारी साताऱ्यातील दोन्ही राजे अर्थात खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यात मध्यरात्री राडा झाला. यानंतर सातारा पोलिसांनी खा. उदयनराजे आणि आणि आ. शिवेंद्रराजे भोसले यांच्यावर हत्येच्या प्रयत्नासह तीन गुन्हे दाखल केले. याप्रकरणी पोलिसांनी कालपासून कार्यकर्त्यांची धरपकड सुरु केली. पण उदयनराजेंच्या केवळ एकाच समर्थकाला पोलिसांनी ताब्यात घेऊन सोडून दिल्याचा आरोप होत असल्याने, आ. शिवेंद्रराजे भोसलेंनी उदयनराजेंना थेट आव्हान दिलं आहे.

पत्रकार परिषदेत उदयनराजेंवर हल्ला चढवताना, पोलिसांच्या एकतर्फी कारवाईवर हक्कभंग दाखल करणार असल्याचं सांगितलं. तसेच जर माझ्यावर अशा पद्धतीने हल्ले होत असतील, आणि जर पोलीस बघ्याची भूमिका घेणार असेल, तर मीही बांगड्या भरल्या नसल्याचे, आ. शिवेंद्र राजेंनी सांगितलं आहे.

शिवाय, यामुळे साताऱ्यात अशांतता पसरली, तर त्याला मी जबाबदार नसल्याचा इशारा दिला आहे. दरम्यान, या प्रकरणी शिवेंद्रराजेंच्या तीन समर्थकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. तर उदयनराजेंच्या एकाच समर्थकाला पोलिसांनी ताब्यात घेऊन सोडून दिल्याने, दोघांमधील वाद विकोपाला गेला आहे.

काय आहे प्रकरण?

काय आहे नेमका वाद?

दोन्ही राजेंमध्ये आनेवाडी टोलनाक्यावरुन राडेबाजी सुरु आहे. हा टोलनाका गेली 12 वर्षांपासून उदयनराजे भोसले यांच्या समर्थकांकडे होता. मात्र, यावेळी रिलायन्स कंपनीनं हा टोलनाका उदयनराजे भोसले यांच्या समर्थकांच्या हातून काढून घेतला, आणि तो आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या समर्थकांच्या ताब्यात दिला. त्यानंतर खासदार उदयनराजे भोसले चांगलेच संतप्त झाले आहेत.

संबंधित बातम्या

शिवेंद्रराजेंच्या घरात घुसण्याचा उदयनराजेंचा प्रयत्न, मध्यरात्री राडा

... तर याद राखा, उदयनराजेंचा आणेवाडी टोल प्रशासनाला इशारा

पवारसाहेबांच्या तीन तिऱ्ऱ्या, आपला सत्ता..: उदयनराजे 

उपराष्ट्रपती निवडणूक : खा. उदयनराजे भोसले मतदानाला गैरहजर