वाशिम : उघड्यावर शौचाला न बसूनही गर्भवती महिलांवर कारवाई करणाऱ्या गुड मॉर्निंग पथकासह गट विकास अधिकाऱ्यांवर विनयभंगासह इतर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. फिरायला गेलेल्या गर्भवती महिलांना उचलून जबरदस्तीने वाहनात टाकण्यात आलं होतं.


गावं हागणदारी मुक्त करण्यासाठी सरकारने सुरू केलेल्या उपक्रमावेळी वाशिममधल्या मेडशी गावात हा प्रकार घडला. या गुड मॉर्निंग पथकाने शौचाला उघड्यावर बसलेल्या नसतानाही दोन गर्भवती महिलांनाही जबरदस्तीने उचलून नेलं.

आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे महिलांनी पथकाच्या कारवाईला विरोध केल्याप्रकरणी त्यांच्यावरच सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

गरोदर महिलेने दिलेल्या तक्रारीनंतर मालेगाव पोलिसात पुष्पलता अफूने, दत्ता चव्हाण, सुखदेव पडघान, इंगोले आणि मालेगाव येथील गट विकास अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पाहा बातमीचा व्हिडिओ :