जालना : भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. ईमेलद्वारे त्यांना ही धमकी देण्यात आली आहे.
खासदार रावसाहेब दानवेंना "प्रदेशाध्यक्षपद आणि खासदारकीचा राजीनामा द्या, नाहीतर गोळ्या घालून जीवे मारु" असा धमकीचा संदेश ईमेलद्वारे पाठवण्यात आला आहे.
रावसाहेब दानवेंचे स्वीय सहाय्यक राजेश जोशी यांनी याप्रकरणी विलास देशमुख या व्यक्तीविरोधात कदीम जालना पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरु केला आहे.