मुंबई : महाराष्ट्रात लागू कऱण्यात आलेल्या प्लास्टिक बंदीला भाजप आमदाराचा खोडा घातला आहे. प्लास्टिक बंदीला डिसेंबर 2019 पर्यंत स्थगिती द्या अशी मागणीच भाजप आमदार राज पुरोहित यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.


कुलाब्याचे आमदार राज पुरोहित यांची मुख्यमंत्र्यांकडे आज प्लास्टिक बंदीला स्थगिती देण्याची मागणी केली. यावेळी त्यांच्यासोबत व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळही मुख्यमंत्र्यांची भेटीला गेलं होतं. या व्यापाऱ्यांनी मोठे प्लास्टिक रिसायकलिंग प्लांट्स सुरू करण्याची मागणी केली.

दरम्यान 2019 च्या निवडणुकांमध्ये व्यापाऱ्यांचा रोष पत्करावा लागू नये यासाठी भाजपच्या आमदारांकडून अशाप्रकारचं पाऊल उचललं गेल्याचं बोललं जात आहे.