मुंबई : विधानपरिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडून येणाऱ्या निवडणुकीत नाशिकमध्ये शिवसेनेने बाजी मारली. त्यानंतर आता शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीतही शिवसेना पुरस्कृत उमेदवार किशोर दराडे विजयाच्या उंबरठ्यावर आहेत.

यापूर्वी झालेल्या निवडणुकीत आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी मदत केल्याचं शिवसेनेचे विजयी उमेदवार नरेंद्र दराडे यांनी बोलून दाखवलं होतं. त्यानंतर आता या निवडणुकीतही शिवसेनेच्या उमेदवाराला भुजबळांनी मदत केल्याचं बोललं जात आहे.

कोण आहेत किशोर दराडे?

नाशिकमध्ये शिवसेना पुरस्कृत उमेदवार किशोर दराडे हे आधी दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचे समर्थक होते. त्यानंतर राष्ट्रवादीमध्ये ते छगन भुजबळ यांचे समर्थक म्हणून ओळखले जातात.

छगन भुजबळ आणि शिवसेनेत याही निवडणुकीच्या आधी फोनवरून चर्चा झाली होती आणि पुन्हा या निवडणुकीत चमत्कार दिसला.

याआधी नरेंद्र दराडे विधानपरिषद नाशिकमध्ये जिंकले, तेव्हा भुजबळांनी आपल्याला पाठिंबा दिल्याचं त्यांनी जाहीरपणे बोलून दाखवलं होतं.

संबंधित बातमी :

LIVE विधानपरिषद निकाल: कोकणातून निरंजन डावखरे आघाडीवर