Bachchu Kadu: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी आजपासून मराठा समाजाला (Maratha Reservation) आंदोलन करण्याचे आवाहन केले आहे. यावर आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी जरांगे पाटलांना सबुरीचा सल्ला दिलाय. ते अकोला येथे बोलत होतेय. सरकारला अंमलबजावणीसाठी थोडा वेळ द्यावा असं बच्चू कडू  म्हणालेय. जरांगेंनी उपोषण करू नये. उपोषण हे क्षत्रियाला शोभत नाहीय. उपोषण हे पंडीत-पुजाऱ्यांना शोभतं या बच्चू कडूंच्या वक्तव्यावर नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहेय. दरम्यान, जरांगे पाटलांनी लोकसभेपेक्षा विधानसभा लढवावी, असा सल्ला कडूंनी जरांगेंना दिलाय. सगेसोयऱ्यांच्या अध्यादेशाची अंमलबजावणी करण्यात कोणतीच तांत्रिक अडचण नसल्याचं कडू म्हणालेत. 


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर माझा पूर्ण विश्वास


मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) संदर्भातील अधिसूचनेविरुद्ध सहा लाख तक्रारी आलेल्या आहेत. पुढील एक महिन्यात या तक्रारींचं निवारण केल्या जाईल, अशी माहिती सामाजिक न्याय सचिवालायाने दिली आहे. अधिसूचना जर लागू झाली तर सगेसोयरे हा विषय देखील लागू होईल. त्यामुळे  सरकारने जो मराठा आरक्षणासंदर्भात कायदा पारित केला, त्यापेक्षा देखील अधिक चांगला कायदा पुढे लागू होईल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. मराठा आरक्षणाचा कायदा हा लागू होईल आणि तो न्यायालयात देखील टिकेल. तसेच कोर्टात टिकल्यानंतर मराठा समाजाला वेगळा आरक्षण मिळेल. मला व्यक्तिशः असं वाटतं, की ओबीसी सोबतच हे आरक्षण अधिक लाभदायक ठरेल आणि या महाराष्ट्रातील वाद देखील सुटेल, असा विश्वास बच्चू कडू यांनी बोलतांना व्यक्त केला. 


छत्रपती वारंवार लढाया लढत नव्हते


प्रकाश आंबेडकर यांनी दिलेल्या सल्ल्यानुसार मनोज जरांगे पाटील यांनी लोकसभा निवडणूक लढवली पाहिजे की नाही, हा त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे. तसेच प्रकाश आंबेडकर यांनी दिलेला सल्ला हा त्यांचा देखील वैयक्तिक सल्ला असू शकतो. मी त्यांना सल्ला देण्यासाठी फार मोठा नाही. मात्र त्यांनी समजा निवडणूक लढण्याचा विचार केलाच, तर लोकसभा न लढता त्यांनी विधानसभा लढवली पाहिजे, असा सल्ला देखील आमदार बच्चू कडू यांनी मनोज जरांगे पाटील यांना दिला. माझे व्यक्तिगत मत असे आहे की,  जरांगे पाटील यांनी दोन-तीन महिने सरकारला वेळ दिला पाहिजे. आगामी निवडणुकांसाठी लागणारी आचारसंहिता ही एप्रिल महिन्यापर्यंत संपते. त्यानंतर मे महिन्यात सरकार काय पुढाकार घेतं, हे बघावं, असे देखील बच्चू कडू म्हणाले. 


इतर महत्वाच्या बातम्या