अकोला : अकोला-बाळापूर मार्गावर 'बर्निंग बस'चा थरार पहायला मिळाला. व्याळा गावाजवळ संध्याकाळी सहाच्या सुमारास ही घटना घडली.


खामगाव आगाराची ही बस खामगावकडून माहूरकडे निघाली होती. व्याळा गावाजवळ ही बस आल्यानंतर गाडीतून धूर निघतांना दिसल्यामुळे चालकांनं प्रसंगावधान राखत गाडी थांबवली.

यानंतर लगेच गाडीतील प्रवाशांना सुखरूप उतरवण्यात आल्यानं सुदैवानं जीवितहानी झाली नाही. पण थोड्याच वेळात संपूर्ण बस आगीच्या ज्वाळांनी वेढली गेली. अकोल्यावरून अग्निशमन दलाची गाडी येईपर्यंत बस पूर्णपणे जळाली होती.