मोपलवार स्टॅम्प पेपर अधीक्षक असताना त्यांनी तेलगीने बनवलेले बोगस स्टॅम्प पेपर विकल्याचा आरोप आहे. या प्रकरणी मुंबईच्या गुन्हे शाखेने मोपलवारांवर गुन्हा दाखल केला होता. मात्र स्टॅम्प पेपर घोटाळाप्रकरणी राधेश्याम मोपलावारांना तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुखांनी वाचवलं, असा आरोप भाजप आमदार अनिल गोटेंनी केला.
मोपलवार हे काँग्रेस-राष्ट्रवादीचं लाडकं ‘प्रॉडक्ट’ असल्याची टीका आमदार अनिल गोटेंनी पत्रकार परिषदेत केली़. मोपलवारांनी 15 वर्षात केलेल्या भ्रष्टाचाराचे पुरावे आपण स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री राजनाथ सिंग, पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री आणि प्रशासकीय प्रमुख डॉ. जितेंद्र प्रसाद, ईडी, सीबीआय, अँटी करप्शन ब्युरो, आयकर या सर्व विभागांना दिल्यानंतर मोपलवारांची चौकशी सुरू झाली असल्याचं अनिल गोटे यांनी सांगितलं.
या पत्रकार परिषदेत अनिल गोटे यांनी मोपलवार आणि सतीश मांगले यांच्यात काय संभाषण झालं याची ऑडिओ क्लिप ऐकवली . मोपलवारांच्या आपल्याकडे 35 ऑडिओ क्लिप असल्याचं अनिल गोटे यांनी सांगितलं.
संबंधित बातम्या :