अकोला : राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनीही आज अकोला जिल्ह्यातील अकोट तालूक्यातल्या कुटासा गावात मतदान केलंय. त्यांनी गावातील शिवाजी विद्यालय मतदान केंद्रावर सपत्निक मतदानाचा हक्क बजावलाय. कुटासा गावाच्या निवडणुकीत सर्व 13 जागांवर आमदार मिटकरींनी उमेदवार उभे केले आहेत. गावात एकूण 46 उमेदवार निवडणुक रिंगणात आहेत. गावात इतर तीन पॅनलही रिंगणात आहेय. यात काँग्रेसचा देशमुख गट आणि भाजपच्या विजयसिंह सोळंके यांची गावात युती आहेय. तर वंचित बहूजन आघाडीचं स्वतंत्र पॅनल उभं आहे. सोबतच युवक काँग्रेसच्या कपिल ढोके गट आणि शिवसेनेच्या संतोष जगताप यांच्या पॅनल रिंगणात आहे.


जिल्ह्यात संजय धोत्रे यांच्या पळसोबडे गावातील ग्रामपंचायत निवडणुकीनंतर आणखी एका गावाच्या निवडणुकीची चर्चा आहे. ही निवडणूक आहे. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांच्या कुटासा गावातील. कुटासा गावाच्या ग्रामपंचायत निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे. कुटासा हे गाव जिल्ह्यातील राजकीय दिग्गजांचं गाव आहे. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष शिवाजीराव देशमुख, काँग्रेसनेते प्रा. उदय देशमुख, माजी जिल्हा परिषद सभापती विजयसिंह सोळंके यांचं हे गाव आहे.



कुटासा ग्रामपंचायत निवडणुकीत आमदार अमोल मिटकरी यांची राजकीय प्रतिष्ठा पणाला लागली आहे. यात आमदार अमोल मिटकरी बाजी मारतात. की विरोधक त्यांच्यावर भारी पडतात, याचं उत्तर 18 तारखेच्या मतमोजणीनंतरच मिळणार आहे.


Grampanchayat Election | जालन्यात अशा पद्धतीनं पार पडलं ग्रामपंचायत निवडणुकांचं मतदान