ठाणे : मीरारोडच्या (Mira Road Tension) नया नगर (Naya Nagar) परिसरात  रविवारी रात्री साडे अकरा वाजता झालेल्या दोन गटातील हाणामारीत नया नगर पोलिसांनी आतापर्यंत 10 जणांना अटक केली आहे. ज्या नया नगरमध्ये ही घटना घडली होती. तेथे सध्या कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. बॅरेकटच्या माध्यमातून प्रत्येक वाहनांवर पोलीस लक्ष ठेवून आहेत. 


नया नगरच्या हाणामारीच्या प्रकरणात आज शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाई यांनी मिरा भाईंदर वसई विरार आयुक्तालयाचे पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांची भेट घेतली. याप्रकरणी पोलिसांनी  नयानगर परिसरात कोंबिग ऑपरेशन करुन, सर्व आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी केली आहे. सरनाईक यांनी ही घटना कुणीतरी प्लॅनिंग करुन घडवून आणली आहे. त्याच्या मास्टर माईंडला ही अटक करावी अशी मागणी पत्राद्वारे केली आहे.


...अन्यथा मिरा भाईंदर बंदची हाक


मीरा भाईंदर शहरात  जातीय तणाव निर्माण करण्याचा कुणीतरी प्रयत्न करत असून, यात 200 हून अधिक आरोपी आहे.  नया नगरमध्ये कोंबिंग ऑपरेशन करुन 48  तासात सर्वांना अटक करण्याची मागणी सरनाईक यांनी केली आहे. असे नाही झाल्यास 25  जानेवारीला मिरा भाईंदर बंदची हाक ही  सरनाईक यांनी यावेळी दिली आहे.


दोन गट आमनेसामने, जोरदार घोषणाबाजी


रविवारी रात्री मीरा रोडच्या नया नगर परिसरात  दोन गटाच्या रॅली निघाल्या होत्या. या दोन रॅली आमनेसामने आल्यानंतर बाचाबाची झाली त्यांनी परिसरात तणावाचे वातावरण पाहायला मिळाले.मीरा भाईंदर पोलिसांनी परिस्थितीवर काही वेळातच नियंत्रण मिळवले. मात्र सध्या परिसरात तणावाचे वातावरण आहे. दोन गट जेव्हा आमनेसामने आले त्यावेळी जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता पुन्हा तणाव निर्माण होऊ नये यासाठी परिसरात पोलिसांनी बंदोबस्त करण्यात आला आहे.


 शहरात मोठा पोलिस बंदोबस्त


तसेच सोशल मीडियावर पसरणाऱ्या अफवा लक्षात घेता हा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहे. समाजात तेढ निर्माण करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. अयोध्येतील राम मंदिर सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर अधिकारी अलर्ट मोडवर आहेत.  शहरात मोठा पोलिस बंदोबस्त करण्यात आला आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. 


हे ही वाचा :


मीरारोडमध्ये दोन गटात मिरवणुकीदरम्यान वाद, वाहनांची तोडफोड; सध्या परिस्थिती नियंत्रणात