अपहरणाचा बनाव, अल्पवयीन मुलीचं प्रियकरासोबत पलायन
एबीपी माझा वेब टीम | 15 Apr 2018 01:37 PM (IST)
अहमदनगर जिल्ह्यातल्या राहुरीतून 2 दिवसांपूर्वी बेपत्ता झालेली अल्पवयीन मुलीबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. या मुलीचं अपहरण झालं नसून ती प्रियकरासोबत पळून गेल्याचं आता उघड झालं आहे.
अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातल्या राहुरीतून 2 दिवसांपूर्वी बेपत्ता झालेली अल्पवयीन मुलीबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. या मुलीचं अपहरण झालं नसून ती प्रियकरासोबत पळून गेल्याचं आता उघड झालं आहे. आपल्या मुलीचं मध्यरात्री अपहरण झालं असल्याची तक्रार या मुलीच्या वडिलांनी पोलिसात दिली होती. यानंतर राहुरी पोलिसांनी मुलीचा शोध घेतला. आणि पारनेर तालुक्यातल्या भाळवणीमधून मुलीला प्रियकरासह ताब्यात घेतलं. घरात झोपलेल्या तरुणीचं मध्यरात्री वडिलांसमोरच अपहरण यानंतर या मुलीच्या चौकशीत तिचं अपहरण झालं नसून ती पळून गेल्याचं उघडं झालं आहे.