Uday Samant : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत आम्ही महायुती म्हणूनच लढले पाहिजे अशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मागणी आहे. परंतू काही ठिकाणी अडचणी निर्माण झाल्या म्हणून अंतर्गत वाद असल्याची माहिती राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. रायगड जिल्ह्यात आम्ही 7 ठिकाणी युती करुन लढत असून ही ताकद आम्ही महायुतीला दिली आहे. परंतु जिथे आम्ही शिवसेना म्हणून स्वबळावर लढतोय तिथे आमचा विजय निश्चित होणार असल्याचा विश्वास उदय सामंत यांनी व्यक्त केला.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलच गरम झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. अनेक ठिकाणी महायुतीतील घटकपक्ष स्वबळावर लढत आहेत. तर काही ठिकाणी महायुती झाली आहे. ज्या ठइकाणी महायुती झाली नाही आणि शिवसेना स्वतंत्र लढत आहे, त्या ठिकाणी शिवसेनेचाच विजय होणार असल्याचा विश्वास मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला आहे.
महेंद्र दळवी यांच्या बालबुद्धीची मला कीव येते, अनिकेत तटकरेंचा आमदार दळवींवर हल्लाबोल
खासदार सुनील तटकरे यांच्या भाजप पक्ष प्रवेश आणि पार्थ पवारांचा घात सुनील तटकरेंनी केला आहे. या आमदार महेंद्र दळवी यांच्या वक्तव्यावर माजी आमदार अनिकेत तटकरे यांनी प्रतिक्रिया देत दळवींवर हल्लाबोल केला. महेंद्र दळवी यांच्याकडे टीका करण्याशिवाय काहीच उरले नाही. त्यामुळं ते अशी टीका करत आहेत. त्यांचे खायचे दात आणि दाखवायचे दात वेगळे असल्याचा आरोप त्यांनी केलाय. त्यांच्या बालबुद्धीची मला कीव येत असून ते चिटर आमदार आहेत. सुनील तटकरे यांचे सर्व पक्षांशी घनिष्ठ संबंध आहेत. त्यामुळे काय पक्ष प्रवेश केला अस नाही. ते सुनील तटकरे यांच्याबद्दल वेगळा भ्रम निर्माण करत आहेत असं म्हणत त्यांनी आमदार दळवींच्या वक्तव्यावर प्रत्युत्तर दिलं.
आम्ही विधानसभेला मंत्री भरत गोगावले आणि महेंद्र दळवी यांचं काम केलं
मंत्री भरत गोगावले यांनी रोहा मधील एका कार्यक्रमात सुनील तटकरे यांच्यावर नाराजगी व्यक्त करत खुलं आवाहन दिल होतं. लोकसभेला आम्ही तटकरे यांचं इमान राखलं, मात्र विधानसभेला तटकरेंनी आम्हाला फसवलं असा घणाघात सुनील तटकरे यांच्यावर केला होता. जर का हे कोणाला खरं वाटत नसेल तर तटकरे त्यांनी महाड मधील विरेश्वर महाराज मंदिर आणि रोहा मधील श्री धावीर महाराज मंदिरातील फुल उचलून दाखवाव असा इशारा त्यांनी तटकरे यांना दिला होता. या आवाहनाला स्वीकारत माजी आमदार अनिकेत तटकरे यांनी मंत्री भरत गोगावले यांना प्रतिआवाहन देत आम्ही तो फुल उचलायला तयार आहोत. एवढंच नाही तर नारळ ठेवायची देखील आमची तयारी आहे. आम्ही विधानसभेला मंत्री भरत गोगावले आणि महेंद्र दळवी यांचं काम केलं आहे. मात्र याबाबतीत फेक नरेतिव्ह पसरविण्याचे काम काहींनी केलं आहे. हे कोणीही नाकारु शकत नाही, असं म्हणत त्यांनी शिंदे सेनेतील दोन्ही आमदारांना उत्तर दिलं.