Ajit Pawar : माझ्या हातात राज्य सरकारची तिजोरी आहे. त्यामुळं माझ्या घड्याळाच्या पाठीशी उभा राहिलात, तर बारामतीसारखं काम तुमच्याकडे करु शकतो, असे मत राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी व्यक्त केले. नळदुर्ग नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजीत प्रचारसभेत अजित पवार बोलत होते. अर्थमंत्री म्हणून मी याकडे बारकाईने लक्ष देईल. काही जण म्हणतात बारामती जिल्हा करायचा मात्र मी जिल्ह्याच्या भानगडीत पडत नाही असेही अजित पवार म्हणाले. 

Continues below advertisement

राष्ट्रवादी काँग्रेस शिव शाहू आंबेडकर यांच्या विचाराने पुढे जात आहे

कॉन्ट्रॅक्टर लोकं पद मिळवण्याचे प्रयत्न करतात आणि तेच काम घेतात, त्यातून लोकांचे प्रश्न अडचणीत येत आहेत.  लोकसभा, विधासभा निवडणूक तुम्ही पाहिली तिथले प्रश्न वेगळे असतात. ही निवडणूक स्थानिक स्वराज्य संस्थेची असल्याचे अजित पवार म्हणाले. यशवंतराव चव्हाणांनी सत्तेच विकेंद्रीकरण करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक सुरू केली होती. मी बारामतीचा चेहरा मोहरा बदलला, पिंपरी चिंचवड चा चेहरा मोहरा बदलला असे अजित पवार म्हणाले. आमच्याकडे काम आहे. मी बोलतो ते करतो, मी शब्दाचा पक्का असल्याचे अजित पवार म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेस शिव शाहू आंबेडकर यांच्या विचाराने पुढे जात आहे, आम्ही भेदभाव करत नाहीत असेही अजित पवार म्हणाले. 

लाडकी बहीण योजना बंद होणार नाही

फेब्रुवारी 2022 मध्ये निवडणुका व्हायला हव्या होत्या. मंगळवारी कोर्टातील एक मॅटर आहे त्यामुळे जिल्हा परिषदेच्या निवडणुका पुढे जाण्याची शक्यता. माझ्या वकिलांनी जी माहिती सांगितली ती सांगतोय  असे अजित पवार म्हणाले. नळदुर्ग शहराचं नाव पोलिस विभागात लाल अक्षरात आहे. ते आता कस लिहायचं? जाहीरनाम्यातील आश्वासनावर असे अजित पवार म्हणाले. लाडकी बहीण योजना बंद होणार नाही असेही ते  म्हणाले. अजित पवारांनी सांगितलं त्यांच मंत्री मंडळातील सर्व धर्म समभाव असल्याचे अजित पवार म्हणाले. 

Continues below advertisement

 कोणत्याही पक्षाने अल्पसंख्याक समाजाला मंत्री पद दिलं नाही पण मी दिले 

यावळी अजित पवार यांनी मंत्रिमंडळातील नेत्यांची जात समूह सांगत मंत्रिपद दिल्याची माहिती दिली देखील दिली. कोणत्याही पक्षाने अल्पसंख्याक समाजाला मंत्री पद दिलं नाही, मात्र मी दिल्याचे अजित पवार म्हणाले. कुरेशी समाजावर बकरी ईद वेळी बाका प्रसंग आला, तेव्हा मी बैठक घेतल्याचे अजित पवार म्हणाले.