Uday Samant on Balasaheb Thackeray Memorial : बाळासाहेब ठाकरे स्मारक (Balasaheb Thackeray Smarak) हे कोणाचं बसायचं ठिकाण झालं नाही पाहिजे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी ठाकरेंना काढलं का? आम्ही रागापोटी काही करत नाही. पण सत्य समजून घेतलं पाहिजे असे मत मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केलं. 


उद्धव ठाकरेंना अध्यश्रपदावरुन हटवण्याची मागणी


शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाच्या  पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले. तर दुसऱ्या टप्प्याचे काम 23 जानेवारी 2026 रोजी म्हणजेच बाळासाहेब ठाकरेंच्या जन्मशताब्दी वर्षााआधी पूर्ण करुन उद्घाटन करण्याचा प्रयत्न असणार आहे. मात्र, या स्मारकावरुन आता राज्याचं राजकीय वातावरण तापल्याचे दिसून येत आहे. शिंदे गटाच्या नेत्यांच्या बैठकीत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या अध्यक्षपदावरून हटवण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. शिंदे गट आता हा प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मंजुरीसाठी सादर करणार असल्याची माहिती शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते रामदार कदम (Ramdas Kadam) यांनी दिली. त्यामुळे शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट असा सामना पुन्हा रंगण्याची शक्यता आहे 


2022 मध्ये स्मारकाचे भूमिपूजन 


2022 मध्ये स्मारकाचे भूमिपूजन झाले आहे. त्यानंतर सरकार बदलले. आता 2026 मध्ये काम पूर्ण होऊन उद्घाटनवेळी जे सरकार असेल, त्याचे ते श्रेय असेल. ज्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले, त्यांना सोडून सगळ्यांना उद्घाटनाला आमंत्रित करणार आहे, असं विधान उद्धव ठाकरे यांनी केलं. उद्धव ठाकरेंच्या या विधानानंतर शिंदे गट आक्रमक झाला आहे. 


बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाबद्दल कोणताही वाज करु नये : प्रविण दरेकर 


रामदास कदम हे शिंदेच्या शिवसेनेत काम करतात. स्मारकाबद्दलचा निर्णय आधी झालेला आहे. बाळासाहेब ठाकरे हे मोठं व्यक्तीमत्व आहे. त्यामुळं त्यांच्या स्मारकाला राजकारणात ओढू नये असं वक्तव्य भाजप नेते प्रविण दरेकर यांनी केलं. स्मारक झालं तेव्हासुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच होते आणि आता सुद्धा देवेंद्र फडणवीस हेच आहेत. बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाबद्दल किंवा त्याच्या अध्यक्षपदाबद्दल कुठलाही वाद होऊ नये असे दरेकर म्हणाले. बाळासाहेब ठाकरे स्मारक वादाचा विषय होऊ नये. पक्षाच्या पलीकडे जाऊन एक वेगळा आदर बाळासाहेब ठाकरेंबद्दल असल्याचे दरेकर म्हणाले. 


महत्वाच्या बातम्या:


Balasaheb Thackeray Smarak: बाळासाहेब ठाकरे स्मारकासंदर्भात आतापर्यंत काय काय घडलं?; अध्यक्षपदी उद्धव ठाकरे नव्हे, तर...