Shivendraraje Bhosale : आपलं चिन्ह कमळ आहे. आता घड्याळाची वेळ चांगली नाही. आता इकडे तिकडे बघू नका. हातातले घड्याळ वेगळं आहे असं म्हणत सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी अजित दादांच्या राष्ट्रवादीवर टीका केली. सातारा जिल्ह्यातील रहिमतपूर नगरपालिकेच्या प्रचारार्थ
आयोजीत करण्यात आलेल्या सभेत शिवेंद्रराजे बोलत होते.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलं
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलच तापल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. राजकीय नेते ऐकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. रहिमतपूर नगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचारार्थ सभेत मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या घड्याळावर जोरदार टीका केली आहे. आपलं चिन्ह कमळ आहे आता घड्याळाची वेळ चांगली नाही, आता इकडे तिकडे बघू नका. हातातलं घड्याळ वेगळं आहे आणि चिन्हाचे घड्याळ वेगळं आहे. सर्वांनी विचार करा आणि भाजपचे उमेदवार निवडून द्या असं आवाहन करत शिवेंद्रराजे भोसले यांनी रहिमतपूर येथील सभेत राष्ट्रवादीवर टीका केली.
सातारा जिल्ह्यातील 9 नगरपालिका आणि एका नगरपंचायतीची निवडणूक जाहीर
राज्य निवडणूक आयोगातर्फे राज्यातील 246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायतींची निवडणूक प्रक्रिया जाहीर केली आहे. त्यानुसार सातारा जिल्ह्यातील 9 नगरपालिका आणि एका नगरपंचायतीची निवडणूक जाहीर झाली असून नगराध्यक्षपद आणि नगरसेवक पदासाठी इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर प्रचाराची रणधुमाळी सुरु झाली आहे. सातारा जिल्ह्यातील सातारा, कराड, महाबळेश्वर, फलटण, वाई कराड, म्हसवड, रहिमतपूर, पाचगणी आणि मलकापूर या नगरपरिषदेच्या थेट नगराध्यक्षपदाच्या लढती स्पष्ट झाल्या आहेत. मेढा नगरपंचायतीत देखील तिरंगी सामना होत आहे. साताऱ्यात मंत्री शिवेंद्रराजे भोसले आणि उदयनराजे भोसले यांच्या उमेदवारासमोर समोर महाविकास आघाडीकडून उमेदवार देण्यात आला. फलटणला रामराजे नाईक निंबाळकर यांचे पुत्र अनिकेतराजे नाईक निंबाळकर आणि रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे बंधू समशेरसिंह नाईक निंबाळकर रिंगणात आहेत.
रहिमतपूर नगरपालिकेत सुनील माने यांच्या पत्नी नंदना माने विरुद्ध भाजपच्या वैशाली माने यांच्यात लढत
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील माने यांनी काही दिवसांपूर्वी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. रहिमतपूर नगरपालिकेत सुनील माने यांच्या पत्नी नंदना माने विरुद्ध भाजपच्या वैशाली माने यांच्यात लढत होणार आहे.
महत्वाच्या बातम्या:
साताऱ्यात दोन्ही राजेंचं मनोमिलन, मंत्री शिवेंद्रराजेंनी दिले संकेत, इच्छुक उमेदवार भाजपच्या चिन्हावरच निवडणूक लढणार