Nawab Malik : एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांच्या गाडीवर झालेल्या गोळीबाराच्या घटनेवर अनेक नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहे. राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. ओवैसी यांच्यावर झालेला हल्ला हा गंभीर बाब आहे. उत्तर प्रदेश सरकारने याबाबतीत कडक पाऊले उचलायला हवीत, असे मलिक म्हणालेत. याचबरोबर अनिल देशमुख यांची जी चार्जशीट आहे, यावरून स्पष्ट होत आहे की परमबिर सिंह यांना केंद्र सरकार वाचवत आहे. अनिल देशमुख यांच्या विरोधात जी काही विधानं करण्यात आलेले आहेत ही सर्व चुकीचे आहेत. लवकरच दूध का दूध आणि पानी का पानी होईल असे मलिक म्हणालेत. तसेच जेव्हा विषय न्यायालयाकडे जाईल तेव्हा नेमक्या खऱ्या बाबी समोर येतील असेही ते म्हणालेत.


मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणांमध्ये सातत्यानं साक्षीदार फुटत असल्याची बाब समोर येत आहे. यानिमित्तानं देशाच्या हितासाठी शहीद होणारे हेमंत करकरे यांच्या प्रामाणिकपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. केंद्रातील सरकार बदलल्यानंतर सरकारी वकील आणि त्याच्याशी संबंधित असणाऱ्या लोकांवर दबाव टाकला जात आहे. माझी मागणी आहे कोर्टाने या सर्व बाबीची दखल घ्यावी असे नवाब मलिक म्हणाले. पुण्यामध्ये इमारत दुर्घटनेची जी घटना घडली हे नक्कीच दुर्दैवी आहे. या संपूर्ण प्रकरणी बिल्डरवर कारवाई करण्यात येईल. यासोबतच याप्रकरणी जे कोणी जबाबदार आहेत त्यांच्यावर देखील कारवाई केली जाईल असे यावेळी नवाब मलिक यांनी सांगितले.


उत्तर प्रदेशात खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्या कारवर गोळ्या झाडण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी  पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे. असदुद्दीन ओवेसी यांच्या कारवर गोळीबार झाल्याची माहिती मिळाल्यानंतर तातडीने पोलीस तपास सुरू करण्यात आला आहे. संबंधित घटनेचा जो व्हिडीओ देखील समोर आला आहे.  दरम्यान, या घटनेनंतर  मिळालेल्या माहितीनुसार ओवैसी यांना सीआरपीएफची झेड श्रेणीची सुरक्षा देखील तत्काळ प्रदान करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हल्ल्यानंतर ओवैसी यांनी सुरक्षा घेण्यास नकार दिला असून, माझी सुरक्षा सरकराची जबाबदारी असल्याचं म्हटलं आहे. 1994 मध्ये मी माझ्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. आतापर्यंत मी कोणतीही सुरक्षा घेतली नाही. मला हे आवडतही नाही. माझी सुरक्षा ही सरकारची जबाबदारी आहे. मी भविष्यातही सुरक्षा घेणार नाही. जेव्हा माझी वेळ येईल तेव्हा मी जाईन असे त्यांनी म्हटले आहे.


महत्त्वाच्या बातम्या: