नवी दिल्ली: AIMIM चे खासदार अससुद्दीन ओवेसी यांच्या गाडीवर गोळीबार करणाऱ्या दोन व्यक्तींना अटक करण्यात मेरठ पोलिसांना यश आलं आहे. घटनास्थळी असलेल्या सीसीटीव्हीच्या माध्यमातून तपासस करत पोलिसांनी या दोघांना अटक केली. गुरुवारी संध्याकाळी खासदार अससुद्दीन ओवेसी यांच्या गाडीवर गोळीबार झाल्याची घटना घडली होती.
खासदार अससुद्दीन ओवेसी हे मेरठवरुर परतत असताना राष्ट्रीय महामार्ग 24 वर हापुडा-गाजियाबाद या ठिकाणी छिजारसी टोल प्लाझाजवळ त्यांच्या गाडीवर गोळीबार करण्यात आला. हल्लेखोरांनी यावेळी चार राऊंड फायर केले होते. त्या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्हीच्या मदतीने पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला आणि दोन आरोपींना अटक केली. घटनेवेळी वापरण्यात आलेले हत्यार जप्त करण्यात आलं आहे.
खासदार अससुद्दीन ओवेसी यांच्यावर गेल्या काही महिन्यात झालेला हा दुसरा हल्ला आहे. आज झालेल्या हल्ल्यानंतर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी हा मुद्दा लोकसभेत उपस्थित केला होता.
खासदार अससुद्दीन ओवेसी यांच्या गाडीवर गोळीबार झाल्यानंतर त्यांच्या गाडी पक्चर झाली. त्यानंतर लगेच त्यांना दुसऱ्या गाडीतून सुखरुप ठिकाणी पोहोचवण्यात आलं होतं. या घटनेची तात्काळ दखल घेऊन मेरठ पोलीस अधीक्षक घटनास्थळी पोहोचले होते आणि त्यांनी तातडीने तपासाचा आदेश दिला होता.
संबंधित बातम्या :
- Owaisi Vehicle Attacked: असदुद्दीन ओवेसींच्या गाडीवर यूपीत गोळीबार; मेरठवरुन परतताना गाडीवर चार राऊंड फायर झाल्याचा दावा
- '18 वर्ष झाल्यावर पंतप्रधान निवडू शकतो तर पार्टनर का नाही', मुलींचं लग्नाचं वय वाढवण्याला ओवेसींचा विरोध
- मुस्लिमांनाही शिकायचंय त्यांना आरक्षण द्या, असदुद्दीन ओवेसींचा सरकारवर हल्लाबोल