Makarand Patil : राज्याच्या विविध भागात जोरदार पावसाला (Heavy Rain) सुरुवात झाली आहे. अनेक ठिकाणी नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. अशातच आज महाराष्ट्रात मान्सूनचं (Maharashtra Monsoon) आगमन झालं आहे. दरम्यान, मान्सूनपूर्व पावसामुळं राज्यातील अनेक भागात शेती पिकांचं नुकसान झालं आहे. या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश विभागीय आयुक्तांना मदत पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील (Minister Makarand Patil) यांनी दिले आहेत. शासकीय निकषानुसार पंचनामे करुन लवकरात लवकर नुकसान भरपाई देणार असल्याचे आश्वासन मंत्री मकरंद पाटील यांनी दिले आहे. 

सातारा (Satara) जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात मान्सूनपूर्व पावसाने झोडपून काढलं आहे. अनेक भागांमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस पडला आहे. त्यामुळं संरक्षण भिंतींसह घरे पडली आहेत. जनावरांचाही देखील मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर शेतीचं देखील मोठं नुकसान झालं आहे. याच संदर्भात राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी महाराष्ट्रातील संपूर्ण विभागीय आयुक्तांना पंचनामा करण्याचे आदेश दिलेले आहेत.  त्याचबरोबर शासकीय निकषानुसार पंचनामे करून लवकरात लवकर नुकसान भरपाई देणार असल्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी  सांगितलं आहे.

राज्याच्या विविध भागात मुसळधार पाऊस

दरम्यान दक्षिण कोकण आणि गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यावर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने गेल्या तीन ते चार दिवसांपासून या भागांत प्रचंड पाऊस सुरु आहे. येत्या 36 तासांत राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. अनेक भागात पावसामुळं नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. काही भागात पावसामुळं जनजीवन देखील विस्कळीत झालं आहे. दरम्यान, एका बाजूला पाऊस पडत असताना दुसऱ्या बाजूला काही भागात शेती पिकांना देखील फटका बसत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. त

महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन 

महाराष्ट्रात आज मान्सूनचे आगमन झाले आहे. तब्बल 12 दिवस आधीच मान्सूनने महाराष्ट्रात प्रवेश केला आहे. मान्सूनचे आगमन झाल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. राज्यातील बहुतांश शेतकरी हे खरिपाच्या शेतीसाठी मान्सूनच्या पावसावर अवलंबून असतात. त्यामुळे मान्सूनच्या आगमानाने शेतकरी सुखावले आहेत. तसेच मान्सून आल्याने गेल्या दोन-तीन महिन्यांपासून उकाड्याचा सामना करणाऱ्या सर्वसामान्यांनीही सुटकेचा निश्वास टाकला आहे.

महत्वाच्या बातम्या:

मुंबईत कधी दाखल होणार मान्सून? यापूर्वी कोण कोणत्या वर्षी मे महिन्यात मुंबईत दाखल झाला होता मान्सून?