Dharashiv Crime News : धाराशिव जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. यात ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांला बेदम मारहाण करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. शिंदे गटात सामील का होत नाही? असा जाब विचारात ही मारहाण केल्याचे सांगण्यात येतंय. तर एका गुन्ह्यात साक्षीदार झाल्याच्या कारणावरून ही मारहाण (Crime News) केल्याचा आरोप सध्या केला जात आहे. पुढे आलेल्या माहितीनुसार, प्रशांत साळुंके अस मारहाण झालेल्या ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठत पुढील तपास सुरू केला आहे. मात्र या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

गळा दाबुन शिविगाळ करत लोखंडी रॉडने मारहाण 

मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणी आरोपी सुदर्शन गाढवे, विनोद जाधव यांच्यासह इतर दोघांविरुद्ध आनंदनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर धाराशिव शहरातील संभाजीनगर येथील काकडे प्लॉट परीसरात ही घटना घडली आहे. या प्रकरणी प्रशांत साळुंके यांना गळा दाबुन शिविगाळ करत लोखंडी रॉडने मारहाण केल्याचा आरोप सध्या केला जात आहे. तर जखमी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यावर धाराशिव मधील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून पोलीस पुढील तपास करत आहे. 

कोकणात पुन्हा ठाकरेंना धक्का? विनायक राऊतांचे कट्टर समर्थकाचा शिंदे गटात प्रवेश

दरम्यान, कोकणात पुन्हा शिवसेना ठाकरे गटाला धक्का बसण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसापासून कोकणात शिवसेना ठाकरे गटाला (Shivsena Thackeray Group)  जोरदार धक्के बसत आहेत. अनेक राजकीय नेत्यांनी पदाधिकाऱ्यांनी ठाकरे गटाला रामराम करत शिवसेना शिंदे गटासह इतर पक्षात प्रवेश करण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळं कोकणात ठाकरेंची ताकत कमी होत असल्याचं बोललं जात आहे.

दरम्यान, अशातच आता रत्नागिरीत (Ratnagiri) उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण, जिल्हा परिषदेचे माजी आरोग्य सभापती विनोद झगडे हे शिवसेना शिंदे गटात जाण्याच्या तयारीत आहेत. हा ठाकरे गटाला मोठा धक्का असू शकतो. असा अंदाज राजकीय वर्तुळातून व्यक्त  केला जात आहे. परिणामी विनोद झगडे हे आगामी काळात नेमकी काय भूमिका घेतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.  

इतर महत्वाच्या बातम्या