जळगाव : भोसरी प्रकरणात पुन्हा चौकशी (Bhosari plot enquiry) करण्याचा निर्णय आमचा नाही तर तपास यंत्रणांचा आहे.  ही चौकशी म्हणजे तपास यंत्रणांचा तपासाचा भाग आहे. जर एकनाथ खडसे ( Eknath Khadse) यात निर्दोष असतील तर त्यांना घाबरण्याची गरज नाही असा टोला पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Minister Gulabrao Patil) यांनी एकनाथ खडसे यांना लगावला आहे.


भोसरी भूखंड प्रकरणात पुन्हा चौकशी केली जात असून सरकारकडून छळ केला जात असल्याचा आरोप एकनाथ खडसे यांनी केला होता. यावर मंत्री गुलाबराव पाटील यांनी उत्तर दिले आहे. भोसरी भूखंड प्रकरण फार जुने प्रकरण आहेत. यात खडसेंचे जावई देखील जेलमध्ये आहेत. आता हे प्रकरण सरकारने बाहेर काढले नाही तर तपास यंत्रणांनी ते बाहेर काढले आहे.  त्यांना पुन्हा यात तपास करायचा असल्याने ते चौकशी करत आहेत. एकनाथ खडसेंना क्लीन चिट मिळाली आहे. ते जर यात निर्दोष असतील तर त्यांना घाबरण्याची गरज नाही, असा टोला मंत्री गुलाबराव पाटील यांनी लगावला. 


उद्धव ठाकरेंना टोला (Uddhav Thackeray)


आमदार फुटीच्या बातमीवरून देखील मंत्री गुलाबराव पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.  सामना पेपर कुणाचा आहे सर्वांना माहीत आहे. आपले राहिलेले आमदार सांभाळण्यासाठीच त्यांच हे वक्तव्य असेल असा टोला मंत्री गुलाबराव पाटील यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे .


नेमकं काय आहे प्रकरण? 
देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) सरकारमध्ये महसूल मंत्री असताना एकनाथ खडसे यांनी पुण्यातील भोसरी येथे 3.1 एकर एमआयडीसी प्लॉट खरेदी करण्यासाठी आपल्या पदाचा गैरवापर केला, असा आरोप 2016 मध्ये झाला होता. 31 कोटी रुपये किंमत असलेल्या या भूखंडाची निव्वळ 3.7 कोटी रुपयांना विक्री झाल्याचा दावा केला गेला होता. रेडीरेकनर दरापेक्षा खूपच कमी बाजारमूल्य दाखवून जमिनीची खरेदी झाल्याचा आरोप आहे. याप्रकरणी देवेंद्र  फडणवीस यांनी निवृत्त न्यायाधीश झोटींग समितीची नियुक्ती केली होती. त्यानंतर हे प्रकरण मागे पडले होते, मात्र आता पुन्हा हे प्रकरण पुढे आल्याने एकनाथ खडसे यांच्या अडचणी वाढल्या आहे.  


महत्वाच्या बातम्या


Eknath Khadse : भोसरी भूखंड घोटाळ्याप्रकरणी एकनाथ खडसेंच्या अडचणी वाढल्या, काय आहे प्रकरण