Chhagan Bhujbal : हिंदी सिनेमा, सीरियल यामुळं घराघरात हिंदी अगोदरच पोहोचली आहे. हिंदी लादण्याची गरज नसल्याचे मत मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले. पहिलीपासून तीन भाषा टाकल्या तर ते कठीणच होईल. आमचा हिंदीला विरोध नसल्याचेही भुजबळ म्हणाले. मी स्वतः एका हिंदी प्रसारक संस्थेचा गेल्या 30 वर्षापासून अध्यक्ष आहे. रविवारी मुंबईत हिंदी सभा व्हायची तेव्हा फुकट शिकायला मिळायचे असेही भुजबळ म्हणाले. आम्ही मराठी शाळेत जरी शिकलो तरी आज काल हिंदी सर्वांना येते आहे. लोकांचा विरोध पाहता हिंदीचा दबाव टाकणं योग्य नाही असे भुजबळ म्हणाले.
हिंदीच्या प्रश्नापेक्षा इतर प्रश्न देखील महत्त्वाचे
अंदरसुल शाळेत मुली जापनीज भाषेत बोलत होत्या. पण त्या मराठी शाळेत शिकत आहेत असे भुजबळ म्हणाले. आम्ही सर्वांना विश्वासात घेऊन हिंदी सक्ती विषयी अंतिम निर्णय घेऊ असे भुजबळ म्हणाले. पावसाळी अधिवेशनात खूप प्रश्न आहेत. शेती, अवकाळी पाऊस, शिक्षण, रस्ते असे शेकडो प्रश्न आहेत. हिंदीच्या प्रश्नापेक्षा इतर प्रश्न देखील महत्त्वाचे आहेत असे भुजबळ म्हणाले. मंत्री दादा भुसे हिंदी प्रश्नावर राज ठाकरे यांना भेटले आहेत. तसेच अनेक नेत्यांना देखील जाऊन भेटत आहेत असे भुजबळ म्हणाले.
किरीट सोमय्या यांच्याबद्दल मला काही बोलायचे नाही. आमच्यावर आरोप झाले, 1 हजार कोटी, 500 कोटी रुपयांचा घोटाळा, भ्रष्टाचाराचे. पण त्यात काहीच तथ्य नव्हते, मात्र कोर्ट कचेरी चकरा माराव्या लागल्या. कुटुंबीय डिस्टर्ब झाल्याचे भुजबळ म्हणाले. आमच्या चार्टर्ड अकाउंटटवर आरोप केले पण त्यांनाही सोडून दिले.
भास्कर जाधव यांच्या नाराजीसंदर्भात बोलताना भुजबळ म्हणाले की, हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. मी शिवसेनेत असल्यापासून भास्कर जाधवांना ओळखतो. अनेकदा मनात असते तेच होते असे नाही.शेतकरी, व्यापारी, उद्योगपती अनेकांच्या बाबतीत तसे होते. आपण लढत राहिले पाहिजे, घरी बसून काय होणार, आणि तुम्हाला घरी कोण बसू देणार ? त्यामुळे आपण लढत राहिले पाहिजे असे भुजबळ म्हणाले.
पहिलीपासून हिंदी लादणे योग्य नाही
आंदोलन करताहेत आनंदाची गोष्ट आहे, व्यक्ती स्वातंत्र्य आहे त्यामुळं आंदोलन करू शकतात. सरकारच्या कानावर हिंदी बाबत टाकलेले आहे. अनेक संस्था, शिक्षण तज्ञ, तसेच अनेक वर्तमानपत्र यामध्ये लेख छापून आलेले आहेत. अनेक तज्ञांचे मतही तेच आहे. पहिलीपासून हिंदी लादणे योग्य नाही असे भुजबळ म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
Raj Thackeray : राज ठाकरेंच्या मोर्चाची तारीख बदलली, 6 ऐवजी 5 जुलैला मोर्चा, दोन ऐवजी एकाच मोर्चासाठी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबत चर्चा