Chandrashekhar Bawankule : पुरंदर विमानतळाच्या (Purandar Airport) बाबत सुरू असलेलं सर्वेक्षण थांबवलं असल्याची माहिती मंत्री चंद्रेशखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी दिली आहे. शेतकऱ्यांच्या मुळावर उठून आम्हाला काही करायचं नाही, याबाबत मी मुख्यमंत्र्यांशी बोलणार असल्याचे बावनकुळे म्हणाले. आमची शेतकऱ्यांना ऑफर आहे, त्यांनी विमानतळ होऊ देणार नाही हा हट्ट सोडावा असेही बावनकुळे म्हणाले.
पुरंदर विमानतळाला 7 गावातील ग्रामस्थांनी मोठा विरोध केला आहे. काल सर्वेक्षण करण्यासाठी आलेल्या पथकाला ग्रामस्थांनी विरोध केला होता. यावेळी पोलिस आणि ग्रामस्थ यांच्यात धक्काबुक्की देखील झाल्याचा प्रकार घडला होताय यावर आज बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भूसंपादनाच्या विरोध असणाऱ्या अनेक मान्यवरांशी चर्चा केल्याचे बावनकुळे म्हणाले.
तुम्हाला जमीन द्यायची नाही पण सरकारला हवी आहे, 7 दिवसात तुमच्या मागण्या कळवा
मी मुख्यमंत्र्यांशी याबाबत चर्चा करणार आहे. पुरंदर विमानतळामुळे पश्चिम महाराष्ट्राचे चित्र बदलणार आहे. शेतकऱ्यांचा माल निर्यात होऊ शकतो, पुण्याच्या विकासाबाबत मुंबई, दिल्लीनंतर येतं. यासाठी हे विमानतळ करण्याचा मानस आहे आणि ती भूमिका शासनाची बदलणार नाही असे बावनकुळे म्हणाले. मी शेतकऱ्यांना विनंती करतोय की तुम्हाला जमीन द्यायची नाही पण सरकारला हवी आहे. 7 दिवसात तुम्ही तुमच्या मागण्या काय आहेत हे आम्हाला कळवा असेही बावनकुळे म्हणाले. जास्तीत जास्त शेतकऱ्यांच्या खिशात काय टाकता येईल अशी भूमिका आम्ही मांडली आहे असे बावनकुळे म्हणाले. शासन एखादी घोषणा करेल तेव्हा सरकारने चांगले दिले आहे असं शेतकऱ्यांना वाटेल असे बावनकुळे म्हणाले.
आम्ही शेतकऱ्यांना ऑफर देऊ, शेतकऱ्यांनी आम्हाला ऑफर द्यावी
आम्ही शेतकऱ्यांना ऑफर देऊ, शेतकऱ्यांनी आम्हाला ऑफर द्यावी, टेबलवर बसून तिढा सुटेल असे बावनकुळे म्हणालेत. पुढील 15 दिवसात पुन्हा चर्चा करु असेही बावनकतुळे म्हणालेत. परवा जी घटना घडली त्याचा सुद्धा आढावा आम्ही घेतल्याचे बावनकुळे म्हणाले. शेतकऱ्यांवर जे गुन्हे दाखल झाले आहेत ते कमी केले पाहिजे अशी त्यांची मागणी आहे. गुन्ह्यात जे लोकं प्रत्यक्षी सहभागी आहेत त्यांचा वेगळा विचार करायला लागेल जे निरपराध आहेत त्यांचे गुन्हे कमी करावे अशी मागणी आहे.
काँग्रेसचा खालचा कार्यकर्ता अस्वस्थ
रविंद्र धंगेकर हे निष्ठावान कार्यकर्ते एकनाथ शिंदे याच्याकडे गेले. संग्राम थोपटे आमच्याकडे आलेत. काँग्रेसचा खालचा कार्यकर्ता अस्वस्थ असल्याचे बावनकुळे म्हणाले. केंद्रात काँग्रेसच्या नेतृत्वाखाली काहीच नाही. राज्यातील नेतृत्वाला देखील कुठली भूमिका घेता येत नाही. काँग्रेस पक्षामध्ये ज्याला वाटतं की काम करायचं नाह, त्यांना भाजपची दारं खुली असल्याचे बावनकुळे म्हणाले.
महत्वाच्या बातम्या: