Pune Accident : कात्रजकडून नवले पुलाकडे जाणाऱ्या रस्त्यावर भीषण अपघातझाल्याची घटना घडली आहे. दुचाकीला टेम्पोने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर दुसरी महिला गंभीर जखमी झाली आहे. लहुबाई अश्रुबा वाघमारे (49, रा. वाघजाईनगर,आंबेगाव खुर्द) असे अपघातात प्राण गमावलेल्या महिलेचे नाव आहे. दुचाकी चालवत असलेल्या प्रियांका राऊत (33) या गंभीर जखमी झाल्या असून, त्यांच्या पायाला फ्रॅक्चर झाले आहे. 

दरम्यान, याप्रकरणी आंबेगाव पोलिसांनी टेम्पो चालक निलेश महादेव नांदगुडे (38, रा. मसोबाची वाडी, ता. इंदापूर, जि. पुणे) याला अटक केली आहे. ही दुर्दैवी घटना काल दुपारी 1 वाजून 30 मिनिटांनी वंडरसिटीजवळ घडली आहे. लहुबाई आणि त्यांची मुलगी प्रियांका दुचाकीवरुन महात्मा फुले मंडईकडे जात होत्या. त्याचवेळी कात्रजकडून नवले पुलाकडे जाणाऱ्या टेम्पो चालकाने त्यांच्या दुचाकीला मागून जोरदार धडक दिली. या अपघातात लहूबाई गंभीर जखमी झाल्या होत्या. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. तर प्रियांका यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. दरम्यान, अधिक तपास आंबेगाव पोलिस करत आहेत. 

महत्वाच्या बातम्या:

अचानक एसटीचा ब्रेक फेल, चालकाने दाखवले प्रसंगावधान, स्वतःचा जीव धोक्यात घालून वाचवले 51 जणांचे प्राण