श्रीरामपूर : राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी आज एक वक्तव्य करुन राजकीय भूकंप केला आहे. राधाकृष्ण विखे पाटील याच्यासाठी शिवसेनेची ऑफर घेऊन आल्याचं सांगत त्यांनी शिवसेनेत येणाचं आवाहन केलं आहे. विखे पाटील यांनी मात्र कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचं म्हटलं आहे. श्रीरामपूर पंचायत समिती नूतन इमारतीचे भूमिपूजन प्रसंगी सत्तार येथे आले होते. त्यावेळी सत्तार यांनी हे वक्तव्य केलं आहे. विखे पाटील यांनी जरी राजकारण नसल्याचे म्हटले तरी राजकीय चर्चांना उधाण आले आहे.


महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार आज राधाकृष्ण विखे पाटील यांच्या भेटीला लोणी गावात दाखल झाले होते. त्यांची राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सोबत चर्चा झाली आणि दोघांनी घरी स्नेहभोजनही केलं. खरं तर विखे पाटील भाजपात जात असताना सोबत कोण जाणार ही चर्चा होत असताना अब्दुल सत्तार यांचे नाव आघाडीवर होते. मात्र, अब्दुल सत्तार शिवसेनेत गेले आणि विखे पाटील भाजपात. आज शिवसेना सत्तेत आहे तर भाजप विरोधात आहे विखे पाटील ज्येष्ठ आणि अनुभवी नेते आहेत, त्यांनी शिवसेनेत यावं अशी ऑफर सत्तार यांनी विखे पाटील यांना दिली आहे. या अगोदरही विखे पाटील शिवसेनेत होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी याबद्दल मी बोलणार असून अंतिम निर्णय ते घेतील, असंही अब्दुल सत्तार म्हणाले आहेत.


येत्या 8 ते 10 दिवसांत परिस्थितीचा आढावा घेऊन लॉकडाऊन संदर्भात निर्णय घेणार : अजित पवार


अब्दुल सत्तार हे माझे चांगले मित्र असून पक्षविरहित आमची मैत्री आहे. आज पंचायत समितीच्या कार्यक्रमासाठी अब्दुल सत्तार यांना आमंत्रीत करण्यात आलं होतं. मात्र, आमची कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याची प्रतिक्रिया भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे. श्रीरामपूर पंचायत समिती नूतन इमारतीचे भूमिपूजन करायचे होते. सत्तार हे त्या खात्याचे मंत्री आहेत. त्यामुळे सत्तार यांना बोलवलं होतं.


कोरोना गेलेला नाही, आता कोरोनाची दुसरी लाट नव्हे 'त्सुनामी' येईल अशी भीती - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे