औरंगाबाद : महाराष्ट्रात प्रस्थापित पक्षांना धक्का देण्यासाठी 'एमआयएम'ने कंबर कसली आहे. येत्या महानगरपालिका निवडणुकांमध्ये फक्त 4 पालिकांनाच टार्गेट करण्याचा निर्णय घेतला आहे.


मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड आणि सोलापूर महापलिकांचा यामध्ये समावेश आहे. एमआयएमचे आमदार इम्तियाज जलिल यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. मुंबईत शिवसेना-भाजप युतीबाबत अद्याप ठोस निर्णय झालेला नाही. त्यामुळे एमआयएमच्या एन्ट्रीने समीकरणं बदलू शकतात.

मुंबईतील 50 ते 60, तर पुण्यातील 40 जागांवर उमेदवार देण्याचा निर्धार एमआयएमने केला आहे. तर पिंपरी-चिंचवडमध्ये 25 आणि सोलापुरात 40 ते 50 जागांवर उमेदवार उभे करण्याची तयारी एमआयएमने केली आहे.