नवी मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कॅशलेसचा नारा दिल्यानंतर संपूर्ण देशभरातून त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्याचाच भाग म्हणून नवी मुंबईतील खारघरमध्ये 'एक धाव कॅशलेस ट्रांझॅक्शनसाठी' या थीमसह मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं होतं.
प्रसिद्ध अभिनेत्री आणि नृत्यांगणा सुधा चंद्रन यांनी या मॅरेथॉनला हिरवा झेंडा दाखवला. 6, 10 आणि 21 किलोमीटर अशी ही मॅरेथॉन आयोजित करण्यात आली होती. या मॅरेथॉनमध्ये नवी मुंबईसह मुंबई, ठाणे आणि रायगडमधून हजारो लोक सहभागी झाले होते.
रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आणि खारघर मॅरेथॉन समितीच्या संयुक्त विद्यमाने या मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं होतं. कॅशलेस ट्रांझॅक्शन हे विकासाच्या दिशेने टाकलेलं पाऊल असून लोकांमध्ये याविषयी जागृती करण्याच्या निमित्ताने या मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं होतं.