AIMIM Rally Live Updates : चांदिवलीमध्ये एमआयमएमची सभा सुरू; पाहा प्रत्येक अपडेट्स
MIM Rally In Mumbai LIVE Updates : एमआयएमची रॅली औरंगाबादहून मुंबईच्या दिशेनं निघाली.. मात्र या रॅलीला मुंबईत प्रवेश मिळणार नसल्याचं स्पष्ट झालंय.
वारिस पठाण यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडलं.
शिक्षणात आम्हाला पाच टक्के आरक्षण मिळालेच पाहिजे. राज्य सरकारला आरक्षण द्यायचं नाही.
सरकार झुकतं हे शेतकऱ्यांनी दाखवून दिलं
आमच्या तिरंगा रॅलीला अनेकदा अडवलं.
ही रॅली नाही रॅला आहे.... आरक्षण नाही दिलं तर लढत राहणार
आरक्षण का देत नाहीत? कोर्टाच्या निर्णयानंतरही आरक्षण दिले नाही.
सरकारला मुस्लमानांसाठी काही करायचं नाही.
एमआयमचे इम्तियाज जलील चांदिवलीकडे रवाना झाले आहे. असुद्दीन ओवेसींची सभा थोड्याच वेळात सुरू होणार आहे.
खारघर टोल नाक्यावर पोलीस बंदोबस्त वाढवला असून एमआयएमची रॅली अडवण्यासाठी पोलीस तैनात करण्यात आले आहे
तिरंगा यात्रेसाठी मालेगाव, धुळे येथून मुंबईला जाणाऱ्या काही कार्यकर्त्यांना चांदवडच्या मंगरूळ टोल नाक्यावर अडविण्यात आल्यानंतर या सर्वांना चांदवड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांना पोलीस स्थानकात आणण्यात आले आहे. सुमारे 25 ते 30 कार्यकर्ते आपल्या वाहनातून जात असताना त्यांना मंगरूळ जवळ अडविण्यात आले
खासदार इम्तियाज जलील रावेतमध्ये पोहोचले, रावेतमध्ये जेवण करुन रॅली पुढे निघणार
मुंबईच्या दिशेने रवाना झालेल्या MIM कार्यकर्त्यांसाठी समाजासाठी पिंपरी चिंचवडच्या रावेतमध्ये जेवणाची सोय करण्यात आलीये. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यासह विविध जिल्ह्यातील कार्यकर्ते इथं दाखल होतायत. इथं जेवण झालं की लगेच त्यांची वाहनं मुंबईच्या दिशेने रवाना देखील होतायत. काही झालं तरी मुंबईत धडकायचं असाच निश्चय MIM ने केलाय.
मालेगाव पोलिसांनी एमआयएम कार्यकर्त्यांना अडवून केले स्थानबद्ध , तिरंगा रॅलीसाठी मालेगाव आणि धुळ्यावरून निघाले होते कार्यकर्ते , मुंबई - आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील एका फार्म हाऊस थांबले होते कार्यकर्ते , मालेगाव व धुळ्याचे 50 हून अधिक कार्यकर्ते निघाले होते
मुस्लिम आरक्षणासाठी MIM पक्षाकडून तिरंगा रॅली काढण्यात आलेली आहे . मात्र मुंबईत प्रवेश नसल्याने मुंबईच्या सीमारेषेवर मुंबई पोलिस तैनात करण्यात आलेले आहेत
मुंबईच्या वेशीवर मुलुंड येथील आनंद नगर जकात नाका येथे नवघर पोलिस सह ,srpf राज्य राखीव पोलिस दल यांचा मोठ्या प्रमाणात बंदोबस्त
MIM चे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबईतील चांदिवली परिसरात रॅली होणार आहे. या सभेलाही पोलिसांची अद्याप परवानगी नाहीये.. तरीही एमआयएम सभा घेण्यावर ठाम आहे. MIM ला सरकारला त्यांच्या आश्वासनांची आठवण करून देण्यासाठी ही रॅली काढण्यात येणार आहे, अशी माहिती MIM चे खासदार इम्तियाज जलील यांनी दिलीय.
याबाबत खासदार इम्तियाज जलील म्हणाले की, ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर मुंबईत रॅली, मोर्चांना बंदी घातल्याचं ऐकलं. रॅली, मोर्चाना बंदी घालणे हा एक जोक आहे. सरकार आणि ओमायक्रॉन व्हायरसची काही बोलणी झाली आहे. 11 आणि 12 तारखेला फक्त ओमायक्रॉन येणार आहे. नंतर आम्ही इथून गेलो की तो पुन्हा येईल, असा टोला जलील यांनी लगावला. हा विचित्र प्रकार आहे. पोलिसांची परवानगी मिळाली आहे. कुणी खोडा घालू नये म्हणून परवानगीची माहिती लपवली असल्याचंही ते म्हणाले. ज्या लोकांनी मुस्लिमांचा उपयोग करुन घेतला आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी विरोधात असताना मुस्लिम आरक्षणाची मागणी करत होते मात्र आता ते सरकारमध्ये बसून गप्प आहेत. आम्ही आगामी निवडणुका आरक्षणाच्या मुद्द्यावर लढवू, असंही ते म्हणाले. आम्ही डेटासह मुस्लिम समाजावर अन्याय झाल्याचं दाखवून देणार आहोत, असंही ते म्हणाले.
मुस्लिम आरक्षण, वक्फ बोर्डाच्या जमिनी आणि इतर मागण्यांसाठी खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्त्वाखाली एमआयएमची रॅली औरंगाबादहून मुंबईच्या दिशेनं निघाली.. मात्र या रॅलीला मुंबईत प्रवेश मिळणार नसल्याचं स्पष्ट झालंय. स्वतः राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी एबीपी माझाशी बोलताना हे स्पष्ट केलंय. मुंबई पोलिसांनी काढलेला आदेश अंतिम समजायचा अशी प्रतिक्रिया गृहमंत्र्यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली आहे. ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर मुंबईत राजकीय सभा आणि रॅलींना बंदी घालण्यात आलीय. त्यामुळं एमआयएमच्या रॅलीला मुंबईत एन्ट्री मिळणं कठीण दिसतंय. दरम्यान औरंगाबाद आणि अहमदनगर सीमेवर पोलिसांनी काही काळासाठी रॅली अडवली होती. मात्र अटी-शर्तींसह रॅलीतील काही वाहनं सोडण्यात आलीय..
पार्श्वभूमी
MIM Rally In Mumbai LIVE Updates : मुस्लिम आरक्षण, वक्फ बोर्डाच्या जमिनी आणि इतर मागण्यांसाठी खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्त्वाखाली एमआयएमची रॅली औरंगाबादहून मुंबईच्या दिशेनं निघाली.. मात्र या रॅलीला मुंबईत प्रवेश मिळणार नसल्याचं स्पष्ट झालंय. स्वतः राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी एबीपी माझाशी बोलताना हे स्पष्ट केलंय. मुंबई पोलिसांनी काढलेला आदेश अंतिम समजायचा अशी प्रतिक्रिया गृहमंत्र्यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली आहे. ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर मुंबईत राजकीय सभा आणि रॅलींना बंदी घालण्यात आलीय. त्यामुळं एमआयएमच्या रॅलीला मुंबईत एन्ट्री मिळणं कठीण दिसतंय. दरम्यान औरंगाबाद आणि अहमदनगर सीमेवर पोलिसांनी काही काळासाठी रॅली अडवली होती. मात्र अटी-शर्तींसह रॅलीतील काही वाहनं सोडण्यात आलीय..
रॅली, मोर्चाना बंदी घालणे हा एक जोक -खासदार इम्तियाज जलील
याबाबत खासदार इम्तियाज जलील म्हणाले की, ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर मुंबईत रॅली, मोर्चांना बंदी घातल्याचं ऐकलं. रॅली, मोर्चाना बंदी घालणे हा एक जोक आहे. सरकार आणि ओमायक्रॉन व्हायरसची काही बोलणी झाली आहे. 11 आणि 12 तारखेला फक्त ओमायक्रॉन येणार आहे. नंतर आम्ही इथून गेलो की तो पुन्हा येईल, असा टोला जलील यांनी लगावला. हा विचित्र प्रकार आहे. पोलिसांची परवानगी मिळाली आहे. कुणी खोडा घालू नये म्हणून परवानगीची माहिती लपवली असल्याचंही ते म्हणाले. ज्या लोकांनी मुस्लिमांचा उपयोग करुन घेतला आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी विरोधात असताना मुस्लिम आरक्षणाची मागणी करत होते मात्र आता ते सरकारमध्ये बसून गप्प आहेत. आम्ही आगामी निवडणुका आरक्षणाच्या मुद्द्यावर लढवू, असंही ते म्हणाले. आम्ही डेटासह मुस्लिम समाजावर अन्याय झाल्याचं दाखवून देणार आहोत, असंही ते म्हणाले.
गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याशी साधलेला संवाद
प्रश्न - नेमकी भूमिका काय आहे?
वळसे पाटील - पोलिसांनी मुंबईच्या संपूर्ण परिसरात कोणतीही रॅली किंवा सभा घेण्यासाठी बंदी घातली आहे, तसा आदेश काढलेला आहे, त्यामुळे कोणत्याही राजकीय किंवा सामाजिक संस्थांना तशा प्रकारचा कार्यक्रम घेता येणार नाही..
प्रश्न - काही गाड्यांसाठी परवानगी मिळाल्याचं कळतंय?
वळसे पाटील - स्थानिक प्रशासन त्या त्या विभागातील अधिकारी तिथल्या तिथल्या परिस्थितीप्रमाणे निर्णय घेतील, त्याप्रमाणे परिस्थिती हाताळतील
प्रश्न - एमआयएमची भूमिका अशी आहे की शांतताप्रिय मार्गाने येतोय आमची अडवणूक का?
वळसे पाटील- पोलिसांकडे माहिती असते त्या माहितीच्या आधारे पोलिस निर्णय घेत असतात, त्या संदर्भातच हा निर्णय पोलिसांनी घेतलेला असणार
प्रश्न - मुंबईत परवानगी असेल की नाही
वळसे पाटील - मुंबई पोलिसांनी जे आदेश काढले आहेत तोच अंतिम आहे असं समजायचं...
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -