MHT CET Admit Card 2020: राज्य कॉमन एंट्रांस टेस्ट सेल, मुंबईकडून महाराष्ट्र कॉमन एंट्रांस टेस्ट 2020 म्हणजेच MHT CET 2020 चं अॅडमिट कार्ड जारी केलं आहे. पीसीएम आणि पीसीबी दोन्ही ग्रुपसाठी अॅडमिट कार्ड उपलब्ध झालं आहे. ज्या विद्यार्थ्यांनी या परीक्षांसाठी फॉर्म भरला आहे ते ऑफिशियल वेबसाईट mhtcet2020.mahaonline.gov.in वर जाऊन आपलं अॅडमिट कार्ड डाउनलोड करु शकतात.


एमएचटी-सीईटी परीक्षा (MHT CET 2020) प्रवेश परीक्षेसाठी जवळपास 4 लाख 45 हजार 780 विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलं आहे. MHT CET 2020 ची पीसीबी ग्रुप ची प्रवेश परीक्षा 01, 02, 04, 05, 06, 07, 08 आणि 09 ऑक्टोबर 2020 रोजी होणार आहे. तर पीसीएम ग्रुपची प्रवेश परीक्षा 12 ऑक्टोबर 2020 तो 20 ऑक्टोबर 2020 दरम्यान घेतली जाणार आहे.


या परीक्षेसाठी अॅडमिट कार्ड जारी केले आहेत. या हॉलतिकिटावर परीक्षेची तारीख, वेळ, परीक्षा केंद्राचा पत्ता, विद्यार्थ्यांची वैयक्तिक माहिती देण्यात आली आहे. तसेच कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा केंद्रावर घ्यावयाच्या खबरदारीविषयीदेखील माहिती देण्यात आली आहे.


MHT CET Admit Card 2020 कसे डाऊनलोड कराल?


- mhtcet2020.mahaonline.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जा.
- MHT CET Admit Card 2020 डाऊनलोड लिंकवर क्लिक करा.
- अॅप्लिकेशन नंबर आणि पासवर्ड टाकून लॉगइन करा.
- आता स्क्रीनवर तुमचे MHT CET Admit Card 2020 अॅडमिट कार्ड दिसेल.
- अॅडमिट कार्ड डाऊनलोड करा आणि प्रिंट काढून सुरक्षित ठेवा.


सीईटी सेलमार्फत विविध 12 अभ्यासक्रमांच्या सीईटीच्या ऑनलाईन प्रवेश अर्ज करण्याच्या प्रक्रियेला 7 सप्टेंबर ते 8 सप्टेंबरपर्यंतची मुदतवाढ देण्यात आली होती.  उच्च व तंत्रशिक्षण विभागांतर्गत येणाऱ्या पदवी आणि पदव्युत्तर व्यावसायिक अभ्यासक्रम परीक्षा यामध्ये अभियांत्रिकी, फार्मसी, आर्किटेक्स्चर , कृषी अभ्यासक्रम, हॉटेल मॅनेजमेंट, लॉ अभ्यासक्रम या सारख्या अभ्यासक्रमाच्या राज्य सामायिक प्रवेश परीक्षा CET परीक्षा घेण्यात येतात.


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI