मुंबई : मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे (म्हाडाचा विभागीय घटक) मुंबईमधील (Mumbai) विविध गृहनिर्माण प्रकल्पांच्या परिसरातील 149 अनिवासी गाळ्यांच्या ई-लिलावाद्वारे विक्रीसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. सुधारित  वेळापत्रकानुसार इच्छुक अर्जदारांना https://eauction.mhada.gov.in संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी व अर्ज करणे, कागदपत्रे अपलोड करणे, अनामत रक्कम ऑनलाईन भरणे या प्रक्रियेसाठी आता 16 सप्टेंबर, 2025 रोजी रात्री 11 वाजून 59वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.        

Continues below advertisement

19 सप्टेंबर, 2025 रोजी सकाळी 11 वाजता ई-लिलावाचा एकत्रित निकाल जाहीर करण्यात येणार

18 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजेपासून सायंकाळी 5 वाजेपर्यंत संगणकीय प्रणालीमध्ये पात्र ठरलेल्या अर्जदारांसाठी ऑनलाइन बोली स्वरूपातील ई-लिलाव www.eauction.mhada.gov.in या संकेतस्थळावर होणार आहे. दि. 19 सप्टेंबर, 2025 रोजी सकाळी 11 वाजता   https://eauction.mhada.gov.in व https://mhada.gov.in या दोन्ही संकेतस्थळांवर ई-लिलावाचा एकत्रित निकाल जाहीर करण्यात येणार आहे. मंडळातर्फे अर्ज करण्यासाठी दुसर्‍यांदा मुदतवाढ देण्यात आली आहे.         

लिलावात कोणत्या भागात किती गाळे आहेत

सदर लिलावात मुंबईतील मुलुंड गव्हाणपाडा येथे 06 अनिवासी गाळे, कुर्ला- स्वदेशी मिल येथे 05 तुंगा पवई येथे 02 कोपरी पवई येथे 23 चारकोप येथे 23, जुने मागाठाणे बोरीवली पूर्व येथे 06, महावीर नगर कांदिवली पश्चिम येथे 06, अनिवासी गाळे, प्रतीक्षा नगर सायन येथे 09, अँटॉप हिल वडाळा येथे 03, मालवणी मालाड येथे 46 अनिवासी गाळे, बिंबिसार नगर गोरेगाव पूर्व येथे 17 अनिवासी गाळे व शास्त्री नगर-गोरेगाव, सिद्धार्थ नगर, मजासवाडी जोगेश्वरी पूर्व येथे प्रत्येकी 01 अनिवासी गाळा विक्रीसाठी उपलब्ध आहे.  https://eauction.mhada.gov.in व https://mhada.gov.in या दोन्ही संकेतस्थळांवर ई-लिलावाचा एकत्रित निकाल जाहीर करण्यात येणार आहे.                        

Continues below advertisement

ई लिलाव प्रक्रियेमध्ये सहभागी होण्यासाठी अर्जदाराचे वय 18 वर्षापेक्षा जास्त असावे

ई लिलाव प्रक्रियेमध्ये सहभागी होण्यासाठी अर्जदाराचे वय 18 वर्षापेक्षा जास्त असावे, अर्जदाराने महाराष्ट्र राज्यातील सन 2018 नंतर काढलेले अधिवास प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक असून ऑफसेट किंमतीनुसार विहित अनामत रक्कम भरणे गरजेचे आहे. सदर लिलावाबाबत विस्तृत पात्रता निकष, प्रत्येक गाळ्याचे विवरण, सामाजिक आरक्षण व अर्ज करण्याची कार्यपद्धती, सविस्तर अटी व शर्ती, ऑनलाईन अर्ज सूचना,माहितीपुस्तिका याबाबतची माहिती https://eauction.mhada.gov.in व https://mhada.gov.in या  संकेतस्थळावरील Lottery>Eauction>eauction या पोर्टलवर उपलब्ध आहे. अर्जदाराने संकेतस्थळावरील व माहिती पुस्तिकेतील सविस्तर सर्व अटी व शर्ती काळजीपूर्वक वाचूनच अर्ज सादर करावा, असे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे.