कालच म्हाडाच्या 972 घरांसाठीची सोडत जाहीर झाली. मुंबईतील विविध भागात 972 जणांना घरं मिळाली. या लॉटरीनंतरच म्हाडाने पुढील वर्षीच्या लॉटरीची घोषणा केली.
गिरणी कामगार आणि सामान्य नागरिकांसाठी ही घरं असतील. गिरणी कामगार आणि सर्वसामान्यांच्या घरांसाठीची सोडत स्वंतत्रपणे काढण्यात येतील.
त्यामुळे मुंबईकरांना पुन्हा एकदा हक्काचं घर मिळवण्याची संधी, म्हाडा उपलब्ध करुन देणार आहे.