MHADA Housing Projects Directive :महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणा (म्हाडा) स्तरावरील सर्व प्रलंबित प्रस्ताव तातडीने मार्गी लावावेत. शासन स्तरावरील आवश्यक प्रशासकीय मान्यता आणि निर्णय प्रक्रियेला गती देऊन सर्वसामान्य नागरिकांना परवडणारी घरे उपलब्ध करून देण्यास सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असे स्पष्ट निर्देश उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार (Sunetra Ajit Pawar) यांनी दिले आहेत. सह्याद्री अतिथीगृह येथे पार पडलेल्या बैठकीत पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या विविध गृहनिर्माण प्रकल्पांचा आणि धोरणात्मक विषयांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

Continues below advertisement

First Come First Serve Directive : प्रतिसाद न मिळणाऱ्या घरांची तत्काळ विक्री

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या की, सर्वसामान्य नागरिकांना परवडणारी घरे उपलब्ध करून देण्यासाठी म्हाडाची मोठी घरांची लॉटरी लवकरात लवकर जाहीर करावी आणि संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक व कालबद्ध पद्धतीने पूर्ण करावी. दोन किंवा त्यापेक्षा अधिक वेळा लॉटरीत प्रतिसाद न मिळालेल्या सदनिकांची 'फर्स्ट कम, FIRST सर्व्ह' तत्त्वावर तातडीने विक्री करावी, जेणेकरून रिक्त घरे पडून राहणार नाहीत आणि इच्छुकांना त्वरित घरे मिळतील, असे निर्देश त्यांनी दिले.

Working Women Hostel Proposal : विद्यार्थी वसतिगृहे आणि महिला हॉस्टेलचा उपक्रम

विद्यार्थी तसेच नोकरीसाठी शहरात स्थलांतरित होणाऱ्या महिलांच्या गरजा लक्षात घेऊन 'वर्किंग वुमन हॉस्टेल' आणि 'विद्यार्थी वसतिगृहे' भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देण्याचा उपक्रम म्हाडामार्फत राबविण्याच्या महत्त्वपूर्ण सूचनाही उपमुख्यमंत्र्यांनी या बैठकीत दिल्या.

Continues below advertisement

Pune MHADA Projects Sanction : शिरूर, खराबवाडी, दापोडी आणि खराडी प्रकल्पांना गती

बैठकीत पुणे आणि परिसरातील विविध महत्त्वपूर्ण प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला:

शिरूर व खराबवाडी : शिरूर येथील १५५.२२ कोटी रुपयांच्या आणि खराबवाडी येथील ८९.४७ कोटी रुपयांच्या म्हाडा गृहनिर्माण प्रकल्पांना प्रशासकीय मान्यता देण्याची प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले.

दापोडी : दापोडी (पुणे) येथे सुमारे ८ ते १० हजार घरांचा मोठा गृहनिर्माण प्रकल्प मार्गी लावण्याच्या सूचना देण्यात आल्या.

म्हाळुंगे-इंगळे : म्हाळुंगे-इंगळे येथील प्रकल्पासाठी पीएमआरडीएकडून (PMRDA) १८ मीटर रुंदीचा रस्ता, पाणीपुरवठा व एसटीपीची कामे वेगाने पूर्ण करण्याचे निर्देश दिले.

खराडी : खराडी येथील म्हाडाच्या भूखंडावरील पोस्ट विभागाचे आरक्षण रद्द करून पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याबाबत चर्चा झाली.

२०% सर्वसमावेशक योजना : २० टक्के योजनेतील लाभार्थ्यांकडून विकासकांकडून आकारण्यात येणाऱ्या अतिरिक्त शुल्काच्या तक्रारींवर स्पष्ट धोरण तयार करण्याचे आदेश दिले.

Sangli PMAY Scheme : सांगली आणि मिरज येथे परवडणारी घरे

प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत मिरज (सांगली) येथील दोन हेक्टर जमीन म्हाडाकडे हस्तांतरित करण्याबरोबरच सांगली शहरातील मोक्याच्या शासकीय जागा म्हाडाला उपलब्ध करून त्या ठिकाणी परवडणाऱ्या गृहनिर्माण प्रकल्पांचा विकास करावा, असेही उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

Sunetra Pawar : निश्चित कालबद्ध कृती आराखडा तयार करण्याचे आदेश

बैठकीच्या शेवटी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सर्व प्रकल्पांसाठी निश्चित कालबद्ध कृती आराखडा तयार करून प्रत्येक प्रस्तावाच्या प्रगतीचा नियमित आढावा घेण्याचे निर्देश संबंधित उच्च अधिकाऱ्यांना दिले.

ही बातमी वाचा: