मुंबई : सर्वसामान्यांना परवडणारी घरं देणाऱ्या म्हाडाची घरं आता सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेली असल्याचं चित्र आहे. म्हाडाच्या घरांच्या किमती आता सर्रासपणे 40 ते 50 लाखांच्या वरती असल्याचं नुकत्याच जाहीर झालेल्या जाहिरातीवरून दिसून आलं. पण दर्जेदार घरांची निर्मिती आणि परवडणारे दर याची सांगड घालत घरांच्या किमती कमी करण्यासाठी लवकरच धोरणात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी दिलं. स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमावेळी त्यांनी हे आश्वासन दिलं.
वाढत्या लोकसंख्येमुळे घरांची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. बदलत्या काळात दर्जेदार घरांची निर्मिती आणि परवडणारे दर यांची सांगड घालणे याचे कौशल्य म्हाडाकडे आहे. आज म्हाडाची घरे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेली असल्याचे बोलले जात आहेत. यावर घरांच्या किमती कमी करण्यासाठी लवकरच धोरणात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी दिलं.
लोकांच्या तक्रारी सोडवण्यासाठी निर्णय घेण्याची गरज
स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत कर्मचार्यांना मार्गदर्शन करतांना संजीव जयस्वाल म्हणाले की, म्हाडा एक लोकाभिमुख कार्यालय आहे. त्यामुळे म्हाडा कार्यालयास भेट देणार्या नागरिकांच्या प्रश्नांबाबत प्रत्येक अधिकारी-कर्मचारी यांनी संवेदनशील असणे अत्यंत महत्वाचे आहे. म्हाडातर्फे आयोजित करण्यात येणार्या लोकशाही दिन कार्यक्रमाच्या दरम्यान अनेक लोकांच्या तक्रारींचे स्वरूप लक्षात आले आहे. त्यादृष्टीने काही धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज आहे.
दर्जेदार घरांची निर्मिती आणि परवडणारे दर यांची सांगड
संजीव जयस्वाल म्हणाले की, लोकशाही दिनाचे आयोजन खर्या अर्थाने सार्थकी लागेल जेव्हा नागरिकांच्या तक्रारी संपुष्टात येतील आणि हे उद्दीष्ट साध्य करण्याकरिता म्हाडा परिवरातील प्रत्येक कर्मचार्याने आपले योगदान दिले पाहिजे. तसेच म्हाडा ही गृहनिर्मिती क्षेत्रात देशातील अग्रेसर संस्था ठरते. नजिकच्या भविष्यात म्हाडाच्या कामाची कीर्ती आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील घेतली जाईल. वाढत्या लोकसंख्येमुळे घरांची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. बदलत्या काळात दर्जेदार घरांची निर्मिती व परवडणारे दर यांची सांगड घालणे याचे कौशल्य म्हाडाकडे आहे.
अधिकृत वेबसाईटवर अर्ज करा, म्हाडाचं आवाहन
म्हाडातर्फे नुकतीच मुंबईतील विविध गृहप्रकल्पातील 2030 सदनिकांची सोडत जाहीर करण्यात आली आहे. सोडत प्रक्रियेत सहभाग घेण्याकरिता म्हाडाच्या https://housing.mhada.gov.in या अधिकृत संकेतस्थळावरून सोडतीसाठी अर्ज नोंदणी करून सोडत प्रक्रियेमध्ये सहभागी व्हावे असं आवाहन करण्यात आलं आहे.
ही बातमी वाचा: