MHADA Exam Postpone LIVE : म्हाडाची आज होणारी परीक्षा पुढे ढकलली! वाचा महत्वाच्या अपडेट्स

MHADA Exam Latest Update :जे विद्यार्थी म्हाडाच्या विविध पदांच्या परीक्षेसाठी निघाले असतील किंवा निघणार असतील त्यांच्यासाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. म्हाडाची आज रविवारी होणारी परीक्षा पुढे ढकलली आहे

abp majha web team Last Updated: 12 Dec 2021 11:01 AM
पेपर फोडण्याआधीच पोलिसांनी आरोपींना पकडला - जितेंद्र आव्हाड

म्हाडा  पेपरफुटी प्रकरणाबाबत बोलताना मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी या पेपरफुटीचा आरोग्य विभाग पेपर फुटी प्रकरणावेळी आरोपींच्या संवादात म्हाडाच्या पेपरबाबत उल्लेख असल्याचं सांगितलं असून पेपर फोडण्याआधीच पोलिसांनी आरोपींना पकडलं, असल्याचंही त्यांनी सांगितलं.

राज्याचा प्रमुखच सक्षम नसेल तर काय होणार? केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची पेपर फुटीवरुन टीका

 भाजपमध्ये कोण मोठं कोण छोटे याचं मूल्यमापन मी करणार नाही


पण संजय राऊत यांनी आग लावण्याचे धंदे बंद करावेत


शिवसेनेला गळती लागली आहे त्याकडे अधिक लक्ष द्या


संजय राऊत यांच्या विधानाला केंद्रीय मंत्री राणे यांचं प्रत्युत्तर


राज्याचा प्रमुखच सक्षम नसेल तर काय होणार?


राज्यात सरकार अस्तित्वात आहे का? हाच मुळात प्रश्न आहे


गेल्या दोन वर्षात राज्य दहा वर्ष मागे गेलय


म्हाडा पेपर फुटीवर केंद्रीय मंत्री राणे यांनी मुख्यमंत्र्यांना केलं लक्ष्य

MHADA Exam: प्रत्येकवेळी किती मनस्ताप सहन करायचा? विद्यार्थ्यांचा आव्हाडांना सवाल ABP Majha

MHADA Exam: प्रत्येकवेळी किती मनस्ताप सहन करायचा? विद्यार्थ्यांचा आव्हाडांना सवाल ABP Majha


पंतप्रधान यांनी मला सांगितलं की शरद पवार यांना सांगा कोरोनामध्ये इतके फिरू नका- प्रफुल्ल पटेल

पंतप्रधान यांनी मला सांगितलं की शरद पवार यांना सांगा कोरोनामध्ये इतके फिरू नका, ते जिकडं तिकडं जात आहेत. पूर आला, वादळ आलं ते त्याठिकाणी जात आहेत. त्यांना म्हणावं तब्येतीची काळजी घ्या. परंतु मी त्यांना म्हंटल ते कुणाचे ऐकत नाहीत. कायम जनतेच्या सेवेसाठी तत्पर असतात

गावावरून हजारो रुपये खर्च करून पुणे मुंबईत आलेल्या विद्यार्थ्यांना भरपाई मिळणार का ?- चित्रा वाघ

आरोग्य खात्यानंतर आता गृहनिर्माण खात्यानं पेपर फुटीची महान परंपरा पुढे सुरू ठेवलीय… मंत्र्यांना रात्रीत पेपर रद्द करावा लागला … 


विद्यार्थ्यांना आर्थिक भुर्दंड तर बसलाच शिवाय मानसिक छळ झालाय…


गावावरून हजारो रुपये खर्च करून पुणे मुंबईत आलेल्या विद्यार्थ्यांना भरपाई मिळणार का ?


- चित्रा  वाघ 





राज्यात सरकार नावाची यंत्रणा कार्यान्वित होणार आहे की नाही? परीक्षा पुढे ढकलल्यानंतर झाल्यानंतर देवेंद्र फडणवीसांची टीका

परीक्षा पुढे ढकलल्यानंतर झाल्यानंतर देवेंद्र फडणवीसांची टीका, 


आरोग्य भरती परीक्षेचा घोळ! पेपर फुटीचे धागेदोरे आरोग्य संचालनालयापर्यंत


आता म्हाडाच्या परीक्षेतही तेच घोळ, मध्यरात्री परीक्षा रद्द करण्याची वेळ!


सरकारी भरतीचा हा बट्ट्याबोळ आणि राज्य सरकार काहीच बोलायला तयार नाही!


भ्रष्टाचार, अनास्था आणि निर्लज्जतेचा कळस!


किती दिवस आणि किती वेळा हे सहन करायचे?


राज्यात सरकार नावाची यंत्रणा कार्यान्वित होणार आहे की नाही?


आज पुन्हा लाखो विद्यार्थ्यांना फटका बसलाय !
नोकरी देऊ शकत नसाल तर किमान त्यांची अशी थट्टा तर करू नका!


दोषींवर कठोर कारवाई कराच!
पण सरकार म्हणून कुणी याची जबाबदारी घेणार की नाही❓





पुणे: म्हाडा भरती परीक्षा अचानकपणे रद्द केल्याच्या निषेधार्थ अभाविपची निदर्शने

पुणे: म्हाडा भरती परीक्षा अचानकपणे रद्द केल्याच्या निषेधार्थ अभाविपने अहिल्या शिक्षण मंडळ ग्रंथालयाबाहेर निदर्शने केली. यावेळी  गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी राजीनामा देण्याची मागणी अभाविपने केली.

शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांच्या आयुष्याचं वाटोळं करणारी भेट- विक्रांत पाटील

राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी त्यांचे नेते शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांच्या आयुष्याचं वाटोळं करणारी भेट विद्यार्थ्यांना दिली आहे. विद्यार्थ्यांच्या आयुष्याची राख रांगोळी करण्याची एकही संधी राज्यातील हे करंट सरकार सोडताना दिसत नाही. हे सरकार उत्कृष्ट कामगिरी करत असेल तर फक्त खंडणी आणि दलाली वसुली मध्ये, बाकी विद्यार्थ्यांच्या सर्वच प्रश्नात अपयशी ठरलेले हे सरकार आहे. आज होणाऱ्या म्हाडाच्या परीक्षा रद्द करण्यात आल्याची माहिती गृहनिर्माण मंत्री रात्री दोन वाजता केवळ एका व्हिडिओ बाईटच्या माध्यमातून देतात हे मोठं दुर्दैव आहे.आरोग्य सेवक भरती परीक्षेतही चार वेळा असे प्रकार झाले, आता म्हाडाच्या परीक्षामध्ये सुद्धा तोच प्रकार! हे सरकार जनसामान्यांचे नाही,तर दलालांचे सरकार आहे या गोष्टीवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झालेला आहे.या सर्व परीक्षा एमपीएससी आयोगाच्या माध्यमातून घ्या अशी मागणी विद्यार्थ्यांची असताना खाजगी कंपन्यांच्या माध्यमातून स्वतःचे आर्थिक हितसंबंध जपण्यासाठी सरकार हे रॅकेट चालवत असल्याचे दिसते. भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने या गोष्टीचा तीव्र निषेध करतो व राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा देतो.


- विक्रांत पाटील
प्रदेश अध्यक्ष
भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र

विद्यार्थ्यांची थट्टा थांबवा- केशव उपाध्ये

आधी #MPSC चा गोंधळ. मग आरोग्य सेवा भरती परीक्षेचा गदारोळ. आदल्या दिवशी परीक्षा रद्द केली. आता तर गृहनिर्माणमंत्र्यांनी मध्यरात्री म्हाडाची भरती परीक्षा रद्द केली. तरुण - तरुणींच्या भवितव्याशी निर्दयी खेळ चालू आहे. हे कसले आघाडी सरकार हे तर गोंधळी सरकार..या सर्व परीक्षा गोंधळाची न्यायालयीन चौकशी करून दोषींना शासन झालेच पाहिजे.विद्यार्थ्यांची थट्टा थांबवा





जितेंद्र आव्हाड यांनी राजीनामा द्यावा,abvp ची मागणी

म्हाडाची परीक्षा निम्म्या रात्री रद्द केल्याने विद्यार्थ्यांना मोठा त्रास झाला. याच्या निषेधार्थ अहिल्या शिक्षण मंडळ लायब्ररी बाहेर Abvp च्या विद्यार्थ्यांनी निषेध केलाय, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात घोषणा देण्यात येताहेत, जितेंद्र आव्हाड यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी abvp ने केलीय

म्हाडा पेपरफुटीचे बिंग फुटले

आज राज्यभरात म्हाडाचा पेपर होणार होता. पेपर फुटल्याचा संशय आल्यानंतर हा पेपर रद्द करण्यात आला. यामागचे कारणही तसेच आहे .ज्या जी ए  सॉफ्टवेअर कंपनीचा डायरेक्टर प्रितेश देशमुख व दोन एजंट हे रात्री विश्रांतवाडी परिसरामध्ये पेपर देण्यासाठी आले होते. तेव्हाच पुणे सायबर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आणि अटक केली . हा पेपर रात्रीतून रद्द करण्यात आला सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा पेपर मोठ्या रकमेला विकला जाणार होता. हा पेपर होण्याआधीच पोलिसांच्या जाळ्यात मुख्य सूत्रधार अडकला . याच्यामागे कोण मोठे सूत्रधार आहेत. याचाही तपास पोलिसांनी सुरू केला आहे.  यापूर्वीही पुणे पोलिसांनी आरोग्य भरतीतील अनेक मोठे अधिकाऱ्यांना अटक केली आहे. त्याचबरोबर लष्कर भरतीचाही पर्दाफाश पुणे पोलिसांनी केलाय . यामागे क्लास चालवणारे मोठ्या प्रमाणावर असतात असा संशय पुणे पोलिसांना होता आणि त्याच आधारे म्हाडा पेपरफुटीचे बिंग फुटले गेले 

 सरकारला फक्त आणि फक्त टक्केवारी गोळा करण्यात रस

भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी म्हटलं आहे की, प्रस्थापितांचे बोलघेवडे जितेंद्र आव्हाड गृह निर्माण खात्याचा दर आठवडायाला एक्सेल शीट मध्ये न चुकता हिशोब घेतात.  पण बहुजन पोरांच्या भविष्याशी निगडीत असलेल्या म्हाडा नोकरी बाबत लक्ष देण्यासाठी त्यांना वेळ नाही. ते स्वतःच मागील आठवड्याभरापासून म्हाडाचे नोकर भरती परीक्षामध्ये घोटाळे होणार आहेत,  त्यात बळी पडू नये म्हणून प्रसारमाध्यमातून आवाहन करत होते. जर त्यांना घोटाळ्याची पूर्व कल्पना होती आणि गृहखातेही राष्ट्रवादीकडे असतानासुद्धा त्यांना मध्यरात्री दीड वाजता परीक्षा रद्द का करावी लागली. यावरून सिद्ध होते की प्रस्थापितांच्या सरकारला फक्त आणि फक्त टक्केवारी गोळा करण्यात रस आहे.  एक एक पै गोळा करून परीक्षेसाठी पोहचलेल्या बहुजन पोरांविषयी, नोकरी अभावी आत्महत्या करणाऱ्या बहुजन पोरांविषयी त्यांना काहीही देणंघेणं नाही, असं पडळकर यांनी म्हटलं आहे. 

परीक्षा जानेवारी महिन्यात होईल - जितेंद्र आव्हाड

आज म्हाडा साठी सकाळच्या सत्रात कार्यकारी अभियंता, उप अभियंता, सहायक अभियंता आणि सहायक विधी सल्लागार तर दुपारच्या सत्रात कनिष्ठ अभियंता पदाची होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याची माहिती गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी परीक्षेच्या आदल्या दिवशी मध्यरात्री ट्विट करून दिली आहे. ही परीक्षा जानेवारी महिन्यात होईल असं देखील जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे. या परीक्षेसाठी आज सकाळच्या सत्रात 50 हजार उमेदवार तर दुपारच्या सत्रात 56 हजार उमेदवार परीक्षा देणार होते.

मंत्री जितेंद्र आव्हाडांनी काय म्हटलंय

 

'सर्व विद्यार्थ्यांची क्षमा मागून काही अपरिहार्य कारणामुळं आणि तांत्रिक अडचणीमुळं म्हाडाची आज होणारी परीक्षा आणि यापुढे होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. या परीक्षा जानेवारी महिन्यात होतील. ही माहिती एवढ्या रात्री यासाठी देतोय की विद्यार्थ्यांनी सेंटरवर जाऊ नये, त्यांना त्रास होऊ नये. परत एकदा क्षमा मागतो'






 

रविवारी होणारी परीक्षा व त्यानंतर होणारी परीक्षा पुढे ढकलली

जे विद्यार्थी म्हाडाच्या विविध पदांच्या परीक्षेसाठी निघाले असतील किंवा निघणार असतील त्यांच्यासाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. म्हाडाची आज रविवारी होणारी परीक्षा व त्यानंतर होणारी परीक्षा पुढे ढकलली आहे. राज्याचे मंत्री जितेंद्र आव्हाडांची मध्यरात्री ट्वीट करत ही माहिती दिली आहे. विद्यार्थ्यांची क्षमा मागत त्यांनी ही माहिती दिली असून याबाबत त्यांनी दिलगिरी व्यक्त करतानाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. 

रविवारी होणारी परीक्षा व त्यानंतर होणारी परीक्षा पुढे ढकलली

जे विद्यार्थी म्हाडाच्या विविध पदांच्या परीक्षेसाठी निघाले असतील किंवा निघणार असतील त्यांच्यासाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. म्हाडाची आज रविवारी होणारी परीक्षा व त्यानंतर होणारी परीक्षा पुढे ढकलली आहे. राज्याचे मंत्री जितेंद्र आव्हाडांची मध्यरात्री ट्वीट करत ही माहिती दिली आहे. विद्यार्थ्यांची क्षमा मागत त्यांनी ही माहिती दिली असून याबाबत त्यांनी दिलगिरी व्यक्त करतानाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. 

पार्श्वभूमी


MHADA Exam Latest Update : जे विद्यार्थी म्हाडाच्या विविध पदांच्या परीक्षेसाठी निघाले असतील किंवा निघणार असतील त्यांच्यासाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. म्हाडाची आज रविवारी होणारी परीक्षा व त्यानंतर होणारी परीक्षा पुढे ढकलली आहे. राज्याचे मंत्री जितेंद्र आव्हाडांची मध्यरात्री ट्वीट करत ही माहिती दिली आहे. विद्यार्थ्यांची क्षमा मागत त्यांनी ही माहिती दिली असून याबाबत त्यांनी दिलगिरी व्यक्त करतानाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. 



  

मंत्री जितेंद्र आव्हाडांनी काय म्हटलंय

'सर्व विद्यार्थ्यांची क्षमा मागून काही अपरिहार्य कारणामुळं आणि तांत्रिक अडचणीमुळं म्हाडाची आज होणारी परीक्षा आणि यापुढे होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. या परीक्षा जानेवारी महिन्यात होतील. ही माहिती एवढ्या रात्री यासाठी देतोय की विद्यार्थ्यांनी सेंटरवर जाऊ नये, त्यांना त्रास होऊ नये. परत एकदा क्षमा मागतो'






आव्हाड यांच्या या ट्विटनंतर त्यावर विद्यार्थ्यांच्या संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. बंद असताना विद्यार्थी आधीच शेकडो रुपये खर्चून नियोजन करून बसले होते. सरकारने प्रत्येक परीक्षार्थीच्या खात्यात नुकसानभरपाई म्हणून 2000 रु. जमा करावेत, असं एका विद्यार्थ्यानं म्हटलं आहे. आरोग्य विभागमध्ये पण तेच म्हाडामध्ये पण तेच. सरकारचा नियोजन शून्य कारभार आहे, असं एका विद्यार्थ्यानं म्हटलं आहे. 


आज म्हाडा साठी सकाळच्या सत्रात कार्यकारी अभियंता, उप अभियंता, सहायक अभियंता आणि सहायक विधी सल्लागार तर दुपारच्या सत्रात कनिष्ठ अभियंता पदाची होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याची माहिती गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी परीक्षेच्या आदल्या दिवशी मध्यरात्री ट्विट करून दिली आहे. ही परीक्षा जानेवारी महिन्यात होईल असं देखील जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे. या परीक्षेसाठी आज सकाळच्या सत्रात 50 हजार उमेदवार तर दुपारच्या सत्रात 56 हजार उमेदवार परीक्षा देणार होते.


काही दिवसांपूर्वी या परीक्षेमध्ये मोठ्या प्रमाणात उमेदवारांकडून पैसे घेण्यात येत असल्याच्या तक्रारी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याकडे आल्या होत्या. त्यानुसार त्यांनी ही दलाली पद्धत मोडीत काढण्यासाठी जी पदं भरायची आहेत. त्या परीक्षेची प्राथमिक परीक्षा आणि त्यातून गुणवत्ता यादीत आलेल्या मुलांची मुख्य परीक्षा होईल असं जाहीर केलं होतं. यासोबतच त्या दलालांना उमेदवारांचे पैसे परत करा असा इशारा देखील दिला होता. आज ही परीक्षा होणं अपेक्षित होतं परंतु मध्यरात्री जितेंद्र आव्हाड यांनी काही तांत्रिक कारणास्तव आपण ही परीक्षा पुढे ढकलत असल्याचं म्हटलं आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.