जळगाव : केळीच्या दरावर चर्चा करण्यासाठी सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यापाऱ्यांसोबत बैठक बोलावली होती. मात्र या बैठकीत शेतकरी आणि व्यापाऱ्यांमध्ये शाब्दीक चकमक झाल्याने बैठकीतच गोंधळ झाला.

बाजार समित्यांमध्ये शेतातून कापून माल नेण्यात येतो, तरीही व्यापाऱ्यांकडून कमी दर देण्यात येतो, अशी शेतकऱ्यांची तक्रार होती. याबद्दल शेतकऱ्यांमध्ये मोठा रोष होता. त्यासाठी मंत्री गुलाबराव यांनी तोडगा काढण्यासाठी बैठक बोलावली होती.

बैठकीसाठी बाजार समिती संचालक आणि केळी उत्पादक शेतकरी उपस्थित होते. मात्र बैठकीत व्यापाऱ्यांकडून मांडण्यात आलेल्या भूमिकेवर शेतकऱ्यांनी आक्षेप घेतला. त्यामुळे एकच गोंधळ उडाला.

दरम्यान यापुढे केवळ परवानाधारक व्यापाऱ्यांनाच माल मिळेल, असा निर्णय शेतकऱ्यांसोबतच्या बैठकीत घेण्यात आला.