नाशिक : नाशिक-मुंबई रेल्वेमार्गावर ईगतपुरीमध्ये नॉन इंटरलॉकिंग कामासाठी उद्या जंबो मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
रविवारी पहाटे 3.45 वाजल्यापासून ते दुपारी 1.45 वाजेपर्यंत हा मेगाब्लॉक घेण्यात येईल. त्यामुळे मनमाड येथून सुटणारी मनमाड-कुर्ला गोदावरी एक्सप्रेस, मनमाड-मुंबई राज्य राणी एक्सप्रेस, मनमाड-ईगतपुरी-मनमाड शटल, भुसावळ-मुंबई-भुसावळ पॅसेंजर, मुंबई-भुसावळ पॅसेंजर, भुसावळ-नाशिक-पुणे हुतात्मा एक्सप्रेस या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
तर मनमाड हून सुटणारी पंचवटी एक्सप्रेस उद्या दौंडमार्गे मुंबईला रवाना होईल आणि पुन्हा त्याच मार्गाने मनमाडला परत येणार आहे. तर जनशताब्दी एक्सप्रेस,तपोवन एक्सप्रेस,या गाड्या दौंड मार्गे मनमाडला येतील.
नागपूर-मुंबई सेवाग्राम एक्सप्रेस मात्र नाशिकपर्यंतच धावणार आहे. तेथून ती पुन्हा नागपूरला रवाना होणार आहे, तर लांब पल्ल्याच्या गाड्या उशिराने धावतील. एकंदरीतच या मेगाब्लॉकमुळे रेल्वे प्रवाशांचे मात्र हाल होणार आहे.
नाशिक-मुंबई रेल्वेमार्गावर उद्या मेगाब्लॉक, अनेक गाड्या रद्द
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
03 Nov 2018 07:47 PM (IST)
नागपूर-मुंबई सेवाग्राम एक्सप्रेस मात्र नाशिकपर्यंतच धावणार आहे. तेथून ती पुन्हा नागपूरला रवाना होणार आहे, तर लांब पल्ल्याच्या गाड्या उशिराने धावतील.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -