Meeting of OBC leaders : मराठा आरक्षणाच्या (Maratha reservation) मुद्यावरुन राज्यात वातावरण गरम झालं आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj jarange patil ) हे गेल्या चार दिवसांपासून मुंबईच्या आझाद मैदानावर आमरण उपोषणाला बसले आहेत. कोणत्याही परिस्थितीत मराठा समाजाला ओबीसीला आरक्षण मिळवून देण्याचा निर्धार त्यांनी केलाय. मात्र, दुसरीकडे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यास ओबीसी नेत्यांचा विरोधा होताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर आज मुंबईत राज्यातील ओबीसी नेत्यांच्या बैठकीला सुरुवात झाली आहे. मंत्री छगन भुजबळांच्या ( Chhagan Bhujbal) प्रमुख उपस्थितीत ही बैठक सुरु आहे. या बैठकीला समीर भुजबळ, पंकज भुजबळ, प्रकाश शेंडगे, लक्ष्मण हाके यांच्यासह इतर ओबीसी नेते उपस्थित आहेत.
बैठकीनंतर मंत्री छगन भुजबळ भूमिका स्पष्ट करणार
दरम्यान बैठकीत मराठ्यांना सरसकट कुणबी ग्राह्य धरून ओबीसीतून आरक्षणाच्या मागणीला विरोध करण्यासाठी रणनीती ठरणार आहे. याबाबत ओबीसी नेत्यांकडून मंत्री छगन भुजबळांना गळ घातली जाणार आहे. मंत्रिमंडळ बैठकीत जरांगेंच्या मागणीला विरोध करण्याची मागणी केली जाणार आहे. बैठकीनंतर मंत्री छगन भुजबळ भूमिका स्पष्ट करणार आहे. या ओबीसी बैठकीला ओबीसी नेते आणि जेष्ठ मंत्री छगन भुजबळ, माजी खासदार समीर भुजबळ, आमदार पंकज भुजबळ, लक्ष्मण हाके, प्रकाश शेंडगे, यांच्यासह लक्ष्मण गायकवाड, स्नेहा सोनटक्के, सत्संग मुंढे,धनराज गुट्टे, दौलत शितोळे, नवनाथ वाघमारे, दशरथ पाटील, दिलीप खैरे, समाधान जेजुरकर यांसह इतर प्रमुख नेते उपस्थित आहे.
ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण देण्यास ओबीसी महासंघाचा विरोध
मराठा समाजाला (Maratha Reservation) ओबीसीमधून आरक्षण (OBC Reservation) द्या या मनोज जरांगे पाटील (Manoj jarange Patil) यांच्या मागणी संदर्भात राजकीय पक्षांनी खास करून महाविकास आघाडीने त्यांची भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी राष्ट्रीय ओबीसी महासंघाने केली आहे. महायुती आणि विद्यमान सरकारने सुद्धा ते ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही, आपली ही जुनी भूमिका पुन्हा अधोरेखित करावी, अशी अपेक्षाही ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ.बबनराव तायवाडे (Babanrao Taywade) यांनी व्यक्त केली आहे. ओबीसी मतांवर राजकारण करणाऱ्या राजकीय पक्षांनी त्यांची भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ बबनराव तायवाडे यांनी एबीपी माझाशी बोलताना व्यक्त केली आहे.
महत्वाच्या बातम्या:
OBC Mahasangh Protest : मनोज जरांगे यांच्या मागणी विरोधात ओबीसी महासंघाचा एल्गार; राजकीय पक्षांनी भूमिका स्पष्ट करावी, डॉ.बबनराव तायवाडे यांची आग्रही मागणी