मुंबईतील मराठा मोर्चाची तयारी, कोल्हापुरात मराठा नेत्यांची बैठक
एबीपी माझा वेब टीम | 30 Jul 2017 08:10 PM (IST)
मुंबईतील मराठा क्रांती मोर्चा यशस्वी करण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन यावेळी मराठा नेत्यांनी दिलं. या मोर्चात संभाजीराजे छत्रपतीही सहभागी होणार आहेत.
कोल्हापूर : मुंबईत येत्या 9 ऑगस्टला होणारा मराठा मोर्चा विशाल व्हावा, यासाठी आज कोल्हापुरात मराठा समाजाची बैठक पार पडली. ज्यात खासदार संभाजीराजे भोसले, आमदार राजेश क्षीरसागर यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि सर्वसामान्य लोक उपस्थित होते. मुंबईतील मराठा क्रांती मोर्चा यशस्वी करण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन यावेळी मराठा नेत्यांनी दिलं. या मोर्चात संभाजीराजे छत्रपतीही सहभागी होणार आहेत. सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून 10 टक्के लोक हे कायदा हातात घेण्याच्या तयारीत आहेत. पण, मुंबईचा मोर्चा हा शांततेच्या मार्गाने यशस्वी करण्याचं आवाहन खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केलं. मराठा आरक्षणासह विविध मागण्यांसाठी मराठा समाजाकडून राज्यभरात शांततेच्या मार्गाने मूकमोर्चा काढण्यात आला. आता राज्याची राजधानी मुंबईतही मराठा मोर्चाचं वादळ धडकणार आहे.