Bhaskar Jadhav : मुंबईतील शिवाजी पार्क (Shivaji Park) परिसरात असणाऱ्या मीनाताई बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याची अज्ञात व्यक्तीने विटंबना केली आहे. मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर (meenatai thackerays statue) लाल रंग फेकल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनंतर शिवाजी पार्क परिसरात काहीशी तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, या घटनेवर शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कुठे गेली तुमचे CCTV आणि पोलीस यंत्रणा. हे जाणीवपूर्वक तर केलं जात नाही ना? जाणीवपूर्वक करत नसाल तर जनतेसमोर सत्य आणा असं वक्तव्य भास्कर जाधव यांनी केलं.
मॉं साहेबांच्या पुतळ्याचा अवमान करण्याचा किंवा पुतळयाची विटंबना करण्याचा प्रयत्न कराल पण त्यांचे कर्तृत्व मोठं आहे. त्यांच्या सभ्यतेवर तुम्हाला डाग लावता येणार नाही असे भास्कर जाधव म्हणाले. मध्यंतरी शिवसेना भवन तोडण्याची भाषा झाली होती. आता निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन जहाल भाषण देखील करायला सुरुवात झाली आहे, असेही भास्कर जाधव म्हणाले. मराठी माणसाला भडकावण्यासाठी हा प्रयत्न नाही ना? असा संशय भास्कर जाधवांनी व्यक्त केला आहे. या घटनेचा निषेध व्यक्त करत भास्कर जाधव यांची सरकारवर टीका केली. जे गुन्हेगार आहेत त्यांना तात्काळ शोधून काढा असेही भास्कर जाधव म्हणाले.
सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीने पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरु
शिवाजी पार्क परिसरात काहीशी तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. अज्ञात व्यक्तीने मीनाताई बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्यावर लाल रंग फेकल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनंतर शिवसैनिकांनी पुतळ्याची साफसफाई केली आहे. पोलिस सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीने आरोपीचा शोध घेत आहेत. दादरच्या शिवाजी पार्कवरील पुतळ्याशी संबंधित ही घटना घडली आहे. काल रात्री कोणीतरी हा लाल रंग टाकल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. हा लाल रंग नेमका कोणी टाकला याचा पोलिसांकडून तपास सुरू आहे.
सकाळी सहाच्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती
बाळासाहेब ठाकरे यांची पत्नी मीनाताई ठाकरे यांना शिवसैनिक प्रचंड मानायचे. 1995 साली मीनाताई ठाकरे यांचे निधन झाले होते. त्यानंतर शिवाजी पार्क परिसरात त्यांचा अर्धकृती पुतळा उभारण्यात आला होता. गेल्या अनेक वर्षांपासून हा पुतळा याठिकाणी आहे. सकाळी सहाच्या सुमारास ही घटना घडल्याचे सांगितले जात आहे. पोलिसांना यासंदर्भातील सीसीटीव्ही फुटेज मिळाले आहे. त्यामध्ये एक व्यक्ती दिसत आहे. या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी संबंधित व्यक्तीचा शोध सुरु केला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार सकाळी 6.10 वाजेपर्यंत सर्व काही व्यवस्थित असल्याचे सीसीटीव्हीमध्ये दिसून आले आहे. याचा अर्थ ही घटना सकाळी 6.10 वाजल्यानंतर झाली असावी अशी माहिती त्यांनी दिली. पोलिसांनी दुपारपर्यंत आरोपीची माहिती समोर येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
महत्वाच्या बातम्या: